महाराष्ट्र वेदभुमी

सा. कार्यकर्ते व मापगाव मा उपसरपंच वसीम कुर यांच्यातर्फे सोगाव येथे इफ्तार पार्टीचे आयोजन,

 


सोगाव : अलिबाग तालुक्यातील सोगाव येथे सामाजिक कार्यकर्ते व मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वसीम कुर व सामाजिक कार्यकर्ते मुद्स्सर कुर यांनी मुस्लिम बांधवांसाठी पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून शुक्रवार दि. ५ एप्रिल २०२४ रोजी सोगाव जामा मशिदीमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते...

     समाजात एकोपा वाढवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करणारे वसीम कुर व मुद्स्सर कुर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या इफ्तार पार्टी कार्यक्रमात सोगाव पंचक्रोशीतील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते...

फोटो लाईन :सोगाव येथे इफ्तार पार्टीत जमलेले मुस्लिम समाज बांधव,

Post a Comment

Previous Post Next Post