शहानवाज मुकादम/रोहा 7972420502
मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजानच्या ईद निमित्ताने विद्युत पुरवठा अखंडित ठेवण्याची मागणी-रशाद करदमे...
श्रीवर्धन: तालुक्यातील मानव अधिकार मिशन रायगड चे अध्यक्ष रशाद करदमे यांचे महावितरण अधिकारी श्री, विजयकुमार बोरसे डी,वाय, इंजिनियर यांना विद्युत पुरवठा अखंडित ठेवण्या साठी दिले निवेदन...
श्रीवर्धन शहरात ईद या सणाला मानव अधिकार मिशन रायगड अध्यक्ष श्री,रशाद करदमे यांनी महावितरण अधिकारी श्री,विजयकुमार बोरसे डी,वाय, इंजिनियर यांना विद्युत पुरवठा साठी निवेदन देत दि:११/०४/२४ रोजी श्रीवर्धन शहरात चार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्या ची केली मागणी...
मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान ईद हा सण श्रीवर्धन तालुक्या मध्ये मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा करण्यात यावा, यासाठी ईद या सणानिमित्त मुस्लिम समाजाची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दखल घेण्यात यावी.
काही दिवसांपासून शहरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने अनेक अडथळे निर्माण होत आहे.
दिनांक 11-04-2024 रोजी सकाळी 6:00 AM ते 9:00 AM वा. च्या दरम्यान चार कर्मचारी बाजारपेठ श्रीवर्धन या ठिकाणी ठेवण्यात यावे...
तसेच संपूर्ण श्रीवर्धन, माणगाव, महाड, म्हसळा, रोहा व इतर तालुक्या मध्ये ही सगळी कडे अशी सोय करण्यात यावी...
या ईद सणानिमित्त महावितरणकडून विद्युत पुरवठा अखंडित ठेवण्यात यावा आशे मानव अधिकार मिशन रायगड चे अध्यक्ष रशाद करदमे यांच्याकडून विद्युत पुरवठा अधिकारी श्री विजयकुमार बोरसे यांना निवेदन देण्यात आला...
