उरण दि.१३ मार्च( अजय शिवकर)
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डाऊरनगर आणि उरण एस टी डेपो व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि.१२ मार्च रोजी दुपार सत्रात उरण एस टी डेपो परिसरात स्वच्छता मोहीम कार्यक्रम संपन्न झाला...डाऊरनगर शाळेतील ६० मुलांनी या स्वच्छता मोहीम कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला...
स्वच्छते बाबत संस्कार रुजावे म्हणून श्री.मच्छिंद्रनाथ म्हात्रे, श्री.देवीदास पाटील,श्री.महेंद्र गावंड आणि श्रीम.रूपाली म्हात्रे यांचे मार्गदर्शनाखाली घनकचरा व प्लास्टिक कचरा वर्गीकरण, कचऱ्याचे फायदे तोटे,या बाबत मार्गदर्शन केले...
सदर कार्यक्रमास उरण एस टी डेपो मधून विभागीय अभियंता सावंत साहेब,मुंबई विभाग कर्मचारी प्रतिनिधी भामरे साहेब, प्रभारी आभार व्यवस्थापक दराडे साहेब, वाहतूक निरीक्षक कदम साहेब वरिष्ठ लिपिक दिपक म्हात्रे, धीरज पाटील, सिध्देश रसाळ, धनंजय पाटील, तानाजी भोईर, अशोक कोळी आदी मान्यवर उपस्थित होते...

