मुरुड प्रतिनिधी शरद पाटील
सार्वजनिक बांधकाम विभाग महाड रायगड...नाबार्ड मार्फत विकास कार्यक्रम सन २०२३-२४ नुसार मंगळवार दिनांक ५/३/२०२४ रोजी भूमिपूजन सोहळा संपन्न झाला...
ग्रुप ग्राम पंचायत कोकनबन अंतर्गत रोहा तालुका मौजे शिळोशी येथील गावाचा २ किलोमीटर ०/००ते १/५०० कि.मी रस्ता तयार करण्याकामी अंदाज पत्रकिय रक्कम ५७,७१,०२५/- रू इतकी असून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले...हा भूमिपूजन कार्यक्रम अलिबाग मुरुड मतदार संघाचे मा.आमदार श्री महेन्द्र शेठ ह.दळवी यांच्या शुभहस्ते करण्यात आला...तसेच यावेळी आ महेंद्र दळवी यांचे पर्सनल असिस्टंट विघ्नेश माळी दिव गावाचे ग्रामस्थ उपस्थित होते..
ग्राम पंचायत कोकनबनचे सरपंचा सौ तेजस्विनी तुषार वाजंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ...तसेच यावेळी कोकनबन गावच्या हद्दीतील सर्व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.. ग्रामस्थांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला...

