महाराष्ट्र वेदभुमी

आ महेंद्र दळवींच्या माध्यमातून व जलसंधारण विभागा मार्फत मापगांव नदीवर बंधारा कामाचे भूमिपूजन




सोगांव : अब्दुल सोगावकर

अलिबाग - मुरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून व मापगाव शिवसेना (शिंदे गट)विभाग प्रमुख जगदीश सावंत यांच्या विशेष प्रयत्नाने महाराष्ट्र राज्य शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत २६ लाख रुपयांच्या खर्चाचे मापगाव - मुशेत नदीवर मापगाव पुलापासून काही अंतरावर बंधारा बांधण्यात येणार आहे, या बंधारा कामाचे भूमिपूजन रविवार दि. ३ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ वाजता माजी ग्रामपंचायत सदस्य विजय भगत यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले. 

              महाराष्ट्र राज्य शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे व येत्या काळात आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून मापगाव ग्रामपंचायत हद्दीत विविध विकासकामे करण्यात येणार असल्याचे मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वसीम कुर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

             या भूमिपूजन कार्यक्रमाला मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वसीम कुर, मापगाव शिवसेना(शिंदे गट) विभाग प्रमुख  जगदीश सावंत, माजी सदस्य विजय भगत, माजी सदस्या स्नेहा रुत, सामाजिक कार्यकर्ते उत्तम राऊत, मुद्स्सर कुर, इलियास हाफिज, निलेश माने, रमेश थळे, मनोज काठे, मोहिते, संतोष रुत, स्वप्नील थळे आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..

*फोटो लाईन :* मापगाव- मुशेत नदीवर आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून जलसंधारण विभागामार्फत बांधण्यात येणाऱ्या बंधारा कामाचे भूमिपूजन करताना उपस्थित मान्यवर,

Post a Comment

Previous Post Next Post