महाराष्ट्र वेदभुमी

मापगांव पंचायत प्रिमियर लीग २०२४ च्या चषकावर ए ३ सोगांव संघाची मोहोर,


अलिबाग : अब्दुल सोगावकर

सोगांव : सानवी स्पोर्ट्स चोरोंडे व जय हनुमान क्रीडा मंडळ, चोरोंडे आयोजित मापगांव पंचायत प्रिमियर लीग २०२४ चषक भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धांचे शनिवार दि. ९ व रविवार दि.१० मार्च असे दोन दिवस चोरोंडे येथील क्रिकेट मैदानावर आयोजित करण्यात आल्या होत्या...

          या स्पर्धेत एकूण ८ संघांनी सहभाग घेतला होता, स्पर्धेत अंतिम सामना ए ३ सोगांव संघ व मल्हार वॉरियर्स चोरोंडे संघामध्ये झाला, यावेळी अटीतटीच्या लढतीत ए ३ सोगाव संघाने बाजी मारत मापगाव पंचायत लीग २०२४ च्या चषकावर आपली मोहोर उमटवली. या संघाला प्रथम क्रमांकाचा ५०,००० रुपये पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले, तर मल्हार वॉरियर्स चोरोंडे या संघाला द्वितीय क्रमांक २५,००० रुपये पारितोषिक व चषक सन्मानित करण्यात आले, यावेळी उत्कृष्ट फलंदाज म्हणून ए ३ सोगाव संघाचा माहीद कुर, याने पटकावला व उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ए ३ सोगाव संघाचा अजिंक्य राऊत याने पटकावले तर उत्कृष्ट सिक्सर किंग म्हणून ए ३ सोगाव संघाचा माहीद कुर याने पटकावले. तर स्पर्धेत सामनावीर म्हणून ए ३ सोगाव संघाचा अक्षय राऊत याला घोषित करण्यात आले. या सर्व विजेत्या संघांना व खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक असे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले...

         स्पर्धेचे पारितोषिक वितरण मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वसीम कुर, माजी सदस्य विजय भगत, माजी ग्रामपंचायत सदस्या स्नेहा रुत, सामाजिक कार्यकर्ते जगदीश सावंत, अशोक नाईक यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी प्रभाकर मोहिते, गितेश करळकर, अजित घरत, मजीद कुर, बंडू अधिकारी, राजेंद्र घरत, विश्वास थळे, मुदस्सर कुर, उत्तम राऊत, सुमेश थळे, तेजस काठे, उदय घरत आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते...

           स्पर्धेत समालोचन नदीम वाकनिस, यश मापगावकर यांनी केले, तसेच स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सानवी स्पोर्ट्स चोरोंडे व जय हनुमान क्रीडा मंडळ, चोरोंडे मंडळाचे कार्यकर्ते मयूर नाईक व सहकारी यांनी मेहनत घेतली...

फोटो लाईन : मापगांव प्रिमियर लीग २०२४ च्या क्रिकेट स्पर्धेत ए ३ सोगांव संघ प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देतांना उपस्थित खेळाडू व मान्यवर,

Post a Comment

Previous Post Next Post