खांब (नंदकुमार कळमकर )
रोहा कोकण रेल्वमार्गावरील रुळावर कोलाड नजीक एका तरुणाला रेल्वेची धडक बसल्याने त्याचे आकस्मित जागीच मृत्यू झाल्याची घटना कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते कोलाड दरम्यान मार्गावर घडली असल्याने परीसरात एकच खळबळ उडाली...
या विषयी कोलाड पोलीसांकडून मिळालेल्या माहितनुसार कोकण रेल्वमार्गावर सोमवार २५ मार्च रोजी रेल्वे रुळावर तालुक्यातील मौजे पाले खुर्द येथील विशाल बाळकृष्ण जाधव वय वर्ष (३०)कोलाड रेल्वे रूलावर किमी नंबर 10/12 जवळ, जि रायगड, महाराष्ट्र, मृत्यूचे कारण: रेल्वेची धडक लागुन त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे...
घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक मोहिते आणि त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी भेट दिली .वरील तारखेस वेळी व ठिकाणी यांतील मयत विशाल बाळकृष्णा जाधव रा पाले खुर्द ता रोहा कि मी 10/12 रेल्वे रूळावरून नेत्रावती एक्सप्रेस लोकमान्य तिलक टर्मिनल ते थिरूअनंतपुम गाडी नंबर 16345 ची ठोकर लागुन मयत झाला म्हणून त्यांची नोंद करण्यात आली आहे...
तसेच घडलेल्या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मिहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मपोना/177 एन ए शिर्के नेमणुक कोलाड पोलीस हे करत आहेत...