अलिबाग प्रतिनिधी,
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रांजणखार येथील घे भरारी महिला ग्रुप यांनी जागतिक महिला दिन तसेच हळदीकुंकू समारंभ व मनोरंजनात्मक खेळ घेवून मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला...यानिमित्त महिला मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.,सदरील कार्यक्रमासाठी रेंज फॉरेस्ट ऑफिसर रायगड समीर शिंदे, मिलिटरी ऑफिसर संतोष जुईकर, महाराष्ट्राचा लाडका आवाज योगेश आग्रावकर, प्रयास हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.रेखा म्हात्रे, तेजस्विनी फाऊंडेशन संस्थापिका जिविता पाटील, स्पर्धा विश्व अकॅडमी अध्यक्षा तपस्वी गोंधळी, सामाजिक कार्यकर्ता रुपेश पाटील, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील, चिंचवली ग्रामपंचायत सदस्य राजेश म्हात्रे, दीप्ती पाटील, जयवंत पाटील, स्मिता शिंदे, करिश्मा जूईकर, सीमा पाटील, रांजणखार गावातील सर्व जेष्ठ मंडळी दतात्रेय गणू पाटील, ज्येष्ठ मंडळी ,महिला वर्ग,आणि समस्थ ग्रामस्थ मंडळ इत्यादी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते...
प्रत्येक मान्यवरांनी आपपल्या क्षेत्रातील अनुभव सांगितले व उपस्थित ग्रामस्थ तरुण वर्ग, महिला यांना मार्गदर्शन केले... महिलांना स्वावलंबी होण्यासाठी तसेच एकमेकींचा आदर करण्यासाठी व तरुण पिढीला MPSC,UPSC परीक्षा देण्यासाठी आव्हान करण्यात आले...मान्यवरांच्या शुभहस्ते गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला... यावेळी डॉ.रेखा म्हात्रे, फॉरेस्ट ऑफिसर समीर शिंदे, ॲड.जीविता पाटील, तपस्वी गोंधळी, संजय पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात घे भरारी महिला ग्रुपचे विशेष कौतुक केले...गावातील जेष्ठ व सामाजिक कार्यात ठसा उमटविणाऱ्या महिलांचा, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला तसेच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून काम करणाऱ्या नागरिकांना देखील गौरवरविण्या आले...
कांचन मच्छिंद्र म्हात्रे यांनी गावात विविध समाज उपयोगी कार्याक्रमांचे नेहमीच आयोजन करत असतात त्याबद्द्ल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन मच्छिंद्र म्हात्रे आणि विजय ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केले... सदरील कार्यक्रमाचे आयोजन घे भरारी महिला वर्ग कांचन म्हात्रे, वृषाली म्हात्रे, श्रुतिका पाटील, रुपाली पाटील, रुचिता म्हात्रे, विश्रांती पाटील, निशा पाटील, मानसी पाटील, नीलिमा म्हात्रे, श्र्वेताली पाटील, दर्शना म्हात्रे, उर्मिला पाटील, अर्चना म्हात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. तर मच्छिंद्र म्हात्रे, मंगेश पाटील, राजेन्द्र पाटील (पाटील टेंडर), गणेश म्हात्रे, अंकुश पाटील, बळवंत वर्तक, राजेन्द्र काशिनाथ पाटील, सनी म्हात्रे, बिपिन पाटील,या सर्वांचे सहकार्य लाभले... मानसी पाटील हिने स्वागत गीत गायले, प्रतिभा पाटील यांनी महिला वर्गासाठी मजेदार गेम घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली...
