महाराष्ट्र वेदभुमी

जलजीवन मिशनचे योजनेच्या कामावरील तक्रारीना ग्रामस्थांकडून पूर्णविराम!


शहानवाज मुकादम/रोहा

मो,7972420502(७९७२४३०५०२)

खैरेखुर्द ग्रामपंचायतच्याच ताब्यात जलजीवन मिशन योजना देण्यास ग्रामस्थ ठाम;

चांडगाव गावाला पाणीपुरवठा नियमित आणि सुरलीत न मिळाल्यास दिला मोर्चाचा ईशारा,

खैरेखुर्द ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा विभागाच्या अडचणीत वाढ..

 रोहा: (दि:१६ मार्च २०२४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वांकाक्षी प्रकल्प म्हणजे जलजीवन मिशन....शासनाने सुरू केलेल्या जल जीवन मिशनचा उद्देश  ग्रामीण भागात पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हा असून वाढत्या लोकसंख्येबरोबर पाण्याची समस्याही वाढत आहेत...


 अनेक ग्रामीण भागात पाण्याची सोय नाही...ग्रामस्थांच्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाय व्हावा म्हणून शासनाने महत्त्वकांक्षी योजना सुरू केली...

 मात्र खैरेखुर्द (ता. रोहा) ग्रुप ग्राम पंचायत अंतर्गत सुरू असलेले जीवन मिशनचे काम अंदाजपत्रक चुकीचे तयार करून निकृष्ट दर्जाचे कामे सुरू असून याकडे संबंधित आधिकरी यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याची चर्चा  ऐकवयास येत आहे. यामुळे शासनाच्या अतिशय महत्त्वकांक्षी सुरू असलेल्या जलजीवन मिशन  योजनेच्या उद्देशालाच तिलांजनी देत संबंधित ठेकेदार व अधिकारी यांनी संगणमत करून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची चर्चा जोरात सुरू असून हे काम चुकीच्या पद्धतीने निकृष्ट करत हर घर जल चा उद्देश साध्य होतो की नाही, की या योजनेतून ही भ्रष्टाचाराचे पाणी पाझरणार का? हा प्रश्न ग्रामस्थासमोर येत आहे...

 म्हणून मौजे चांडगाव गावातील पाणीपुरवठाच सुरु नसल्याने ग्रामपंचायतीनेच ही योजना ताब्यात घेऊन पाणीपुरवठा सुरलीत व नियमित मिळावा अशी मागणी चांडगाव ग्रामस्थांकडून खैरेखुर्द ग्रामपंचायतचे सरपंच मुजम्मील गीते यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे...

 चांडगाव गावाला पाणीपुरवठा नियमित आणी सुरलीत न मिळाल्यास अध्यक्ष अनिल साळावकर आणी ग्रामस्थांकडून खैरेखुर्द ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा विभागाला दिला मोर्चाचा ईशारा,

चांडगाव जलजीवन मिशन योजनेचे ठेकेदार तांबटकर याच्याकडे संपर्क साधला असता तांबटकर म्हणाले मी सदरचे काम अंदाजपत्रकानुसार केले आसुन काम पुर्ण झालेले आहे...

 तरी सदर चे बील आदा होण्यास खैरेखुर्दचे सरपंच विना कारण सही करत नसल्याने राजिप अलिबाग येथे तक्रार केलेचे सांगितले...खैरेखुर्द ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा विभागाचा हा अपयश.असल्याने अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे...

 तसेच खैरेखुर्द ग्रामपंचायत हद्दीतील जलजीवन मिशन योजनेंतर्गत कामांची वरिष्ठांकडून दखल घेउन संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत आसलेने खैरेखुर्द ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत जल जीवन मिशनच्या  निकृष्ट कामाबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदार यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून सदर चे कामे उत्कृष्ट दर्जाचे होईपर्यंत संबंधित ठेकेदारांचे बिल  थांबवण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांमध्ये जोर धरत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post