शहानवाज मुकादम / रोहा
ठेकेदार रायगड जिल्ह्यातील असल्यास त्याचे ओळखपत्र, बॅकखाते,१२नं फॉर्मवरील सही सिद्ध करावी...
रोहा: (दि:२० मार्च २०२४) तालुक्यातील खांबेरे ग्रामपंचायत हद्दीतील मुरुम भराव प्रकरणात राजिप कडुन शेस फंडअंतर्गत कामातील भ्रष्टाचाराच्या सुनावणीचा निर्णय देण्यास जाणुन बुजून दिरंगाई होत असुन पंचायत समिती रोहा व रायगड जिल्हा परिषदकडून भ्रष्टाचाऱ्यांची पाठराखण...
सविस्तर, रोहा तालुक्यातील खांबेरे ग्रामपंचायत हद्दीतील मुरुम भराव टाकण्याचे खोटे इतिवृत्त तयार करुन काम न करताच बिल आदा करुन शासनास दाखवून व भासवून दिशाभूल करून सदर कामात भ्रष्टाचार झालेला आहे...
खैरे खुर्द कब्रस्तान ची हद्द ग्रामपंचायत खांबेरेत येत असुन त्या परिसरातील सर्व कामे खैरेखुर्द ग्रामपंचायत करुन होत असुन खैरेखुर्द चे ग्रामसेवक अप्पासाहेब कांबळे गेल्या १५ वर्षापासून खैरेखुर्द ते खांबेरे ग्रामपंचायत वर काम करीत असुन ग्रामपंचायत खांबेरेत असतानाच ही हद्द बदलून भ्रष्टाचार झालेला आहे,
नक्कीच खैरेखुर्द कब्रस्तान ची हद्द कोणत्या ग्रामपंचायतमध्ये येते हा प्रश्न उपस्थित होत आहे...सध्या खैरेखुर्द ग्रामपंचायतीवर ग्रामसेवक कांबळे कार्यरत आसुन खैरेखुर्द कब्रस्तान चे विकास कामे होत असलेने मग ही हद्द मर्जीनुसार बदलून पदा चा गैर वापर नाही का?
दि:१५ मे २०२३, च्या राजिप अलिबाग करील सुनावणीचा निर्णय देण्यास जाणुन बुजून दिरंगाई होत आहे...सदरची सुनावणी अतिरिक्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजिप चे सत्यजित बडे यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती...
तक्रारदार म्हणून मी स्वतःच हजर असुन लेखी विषय व तोंडी विषय सादर करण्यात आला होते...सदरच्या सुनावणीतील निर्णय राजिप करुन आजतागायत मिळालेला नाही... सुनावणीत सादर केलेल्या विषयातील मुद्दा क्र १-पंचायत समिती शेस फंडअंतर्गत कामाचे तीन नावे आहेत...
मुद्दा क्र २-ठेकेदाराचे खोटे नाव व खोटी सही नमुना नंबर १२ च्या फॉर्मवर उघड दिसत असुन रक्कम दिलेल्या ठेकेदाराचे विषयी कोणतेही ठराव ग्रामपंचायतीने केले नसतानाच बिडिओ रोहा श्रीम शुभदा पाटील यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचविण्याचे जाणुन बुजून पर्यत्न केले आहे...
मुद्दा क्र ३-रोहा पोलीसांकडून जवळपास तपास पुर्ण करुन मा.गट विकास अधिकारी पंचायत समिती रोहा यांना दिलेला चौकशी अहवाल व दोन वेगवेगळे पत्र...
तसेच सदर विषयात राजिप वरिष्ठांकडून चौकशीअंत कारवाई ची मागणी केली असता बिडिओ रोहाकडे नियमोचित कारवाई करण्याचे पत्र व्यवहार करुन बोट दाखवतात,
तसेच बिडिओ रोहा राजिप कडे बोट दाखवतात...अशा प्रकारे तक्रारदारास घुमजाव...पंचायत समिती रोहा करुन माहितीच्या अधिकारातील मिळालेल्या माहितीनुसार तक्रारीत तथ्य नसल्याचे पत्र व्यवहार करुन तक्रारदार ची दिशाभूल...
"सदर भ्रष्टाचारा प्रकरणात तक्रारदाराचा पंचायत समिती रोहा ला खुले आव्हान"
सदरच्या कामातील रक्कम अदा करण्या कामी वापरण्यात आलेल्या नमुना नंबर १२ फॉर्मवर सही संबंधित ठेकेदाराची असल्यास व संबंधित ठेकेदार मुजावार गीते रायगड जिल्ह्यातील रहिवाशी असल्यास त्याचे ओळख पत्र आणि बॅके चे खाते सिद्ध करावे असे खुले आव्हान बिडिओ रोहा यांना करीत असून राजिप च्या वरिष्ठांकडून दखल घेउन चौकशीअंत भ्रष्टाचाराविरुद्ध आणि खोटे इतिवृत्त तयार केले बाबत कारवाई होणे गरजेचेच होते...
मात्र संबंधित प्रशासनाकडून तक्रारदारास निराशाच मिळाली... भ्रष्टाचार म्हणजे स्वतःच्या व्यक्तिगत लाभासाठी स्वतःला मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करणे होय...
पंचायत समिती रोहा व रायगड जिल्हा परिषदकडून सदर कामाचे ठेकेदार मुजावार गीते ही व्यक्ति पुर्ण रायगड जिल्ह्यात आसल्यास व त्या ठेकेदाराचे ओळख पत्र आणी नमुना नंबर१२ फॉर्मवरील सही खरी आसल्यास सिद्ध करावे...तक्रारदाराची तक्रार खोटी असल्यास शिक्षा भोगण्यास तयार आहे...
अन्यथा, संबंधित भ्रष्टाचारातील उप अभियंता जुजगार,माजी सरपंच, ग्रामसेवक अप्पासाहेब साहेब कांबळे आणि संबंधित अधिकारी व ज्यांनी ज्यांनी मदत केली आश्या भ्रष्टाचार करणाऱ्यांची पाठराखण करीत असल्याचे तक्रारदाराचे आरोप आहे...
