अब्दुल सोगावकर : अलिबाग
सोगाव : दि.२० मार्च अलिबाग तालुक्यातील सोगाव येथील मापगाव ग्रामपंचायत माजी उपसरपंच व माजी मुस्लिम समाज अध्यक्ष वसीम कुर यांनी रमजान महिन्यात वीज पुरवठा खंडित होत असल्याबाबत महावितरण कंपनीचे चोंढी विभाग अभियंता यांना वीजपुरवठा खंडित न करण्यासाठी निवेदन दिले आहे.
याबाबत वसीम कुर यांनी निवेदनात म्हटले आहे की, मुस्लिम समाजाचा रमजान हा पवित्र असा उपवासाचा महिना आहे, हा महिना ११ मार्च पासून सुरू झाला असून हा महिना पुढील १० तारखेच्या दरम्यान संपणार आहे, या उपवासाच्या एक महिन्यात आम्ही सर्व मुस्लिम बांधव पहाटे लवकर उठून जेवण(सेहरी) करतो, व संध्याकाळी ७ वाजता दरम्यान उपवास (इफ्तार) सोडतो, यावेळी सर्व घरातील महिला जेवण बनवतात, तरी जेवण करत असताना आपल्या कडून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे महिलावर्गांना नाहक मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, तसेच १० वी, १२ वी च्या व इतर मुलांच्या महत्वाच्या वार्षिक परीक्षा देखील सुरू झाल्या आहेत, यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात देखील वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे खंड पडून, विद्यार्थ्यांचे देखील नुकसान होत आहे.
तरी आपण या कालावधीत वीज पुरवठा खंडित होऊन गैरसोय होऊ नये, याची पुरेपूर काळजी घ्यावी, जेणेकरून सर्वांची गैरसोय होणार नाही, असे वसीम कुर यांनी निवेदनात म्हटले आहे.
याबाबत महावितर सहाय्यक अभियंता चोंढी अनुप इंगळे यांनी सकारात्मक प्रतिसा देत वीजपुरवठा खंडित बाबतीत योग्य ती काळजी घेण्यात येईल असे सांगितले आहे...
फोटो लाईन : रमजान महिना व विद्यार्थ्यांच्या परीक्षा काळात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे वसीम कुर महावितरण कंपनी अभियंता यांच्या कार्यालयात निवेदन देताना,

