महाराष्ट्र वेदभुमी

भाजपा माणगाव तालुका चिटणीस महेंद्र कासरेकर यांचा पक्षाच्या पदाचा तडकाफडकी राजीनामा


माणगाव प्रतिनिधी : सिकंदर आंबोणकर

भाजप माणगाव तालुका चिटणीस महेंद्र कासरेकर यांना काही महिन्यापूर्वी पक्षाने माणगाव तालुका चिटणीस पदाची जबाबदारी दिली होती.मागील ग्रामपंचायत निवडणुक रणधुमाळी मधे ग्रुप ग्रामपंचायत नागाव वर सर्वांना सोबत घेऊन प्रथमच ग्रामपंचायत वरती भाजपाचा झेंडा फडकवला...

ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये कोणी आपल्या भावाशी,कोणी आपल्या मुलांशी,कोणी आपल्या नात्या-गोत्यात सगळ्यांन जवळ वैर पत्करले,काहींनी तर आपल्या पतीच्या विरोधात देखील प्रचार केला... निवडणूक जिंकली व तालुक्यात प्रथम भाजपचा सरपंच निवडून आणण्याचा मान त्यांनी मिळवला...

पक्षांमध्ये चांगल्या प्रकारे काम चालू असताना जिल्हा पातळीवरील पदाधिकारी त्यांना योग्य ती वागणूक देत नाहीत किंवा पक्षाच्या कुठल्याही प्रकारच्या कामामध्ये त्यांना विश्वासात घेतलं जातं नाही हे त्यांना लक्षात येऊ लागलं,सदर बाब त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ जिल्हा पदाधिकाऱ्यांना वारंवार विचारण्याचाही प्रयत्न केला,तरीही जिल्हा पदाधिकारी त्यांच्या सर्व गोष्टीकडे काणाडोळा करायला लागले...पक्ष वाढीसाठी आपण जर काम करत असताना देखील पदाधिकारी आपल्याला कुठल्याही प्रकारचा मान देत नाहीत किंवा ही कुठल्याही विषयांमध्ये आपल्याला जवळ करत नाहीत हे लक्षात आल्यावर त्यांनी तडका फडकी निर्णय घेतला व त्या अनुषंगाने पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश साटम यांना नाराजी चे राजीनामा पत्र दिले,आणि नाराजी पत्राची प्रत त्यांनी आमदार प्रवीण दरेकर,मा.आमदार धैर्यशील पाटील द.रायगड जिल्हा अध्यक्ष तसेच सतीश धारप, रायगड जिल्हा पक्षाचे निवडणूक प्रमुख यांना प्रत रवाना केली आहे...

पक्षांमध्ये जिल्हा पातळीच्या पदाधिकार्यान कडून कश्या प्रकारची कार्यकर्त्यांला वागणूक मिळते व कशी कार्यकर्त्यांची घुसमट केली जाते त्याचं विस्तृत निबंधचं लिहीला आहे असं त्यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलतांना सांगितले...

Post a Comment

Previous Post Next Post