महाराष्ट्र वेदभुमी

रॉयल एज्युकेशन सोसायटीचा निकाल मोहसीन उंडरे यांच्या पक्षात!




शहानवाज मुकादम/रोहा

मो.7972420502(७९७२४२०५०२)

श्रीवर्धन मध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा मोठा विजय...

श्रीवर्धन: (१८ मार्च २४) सध्या सर्वत्र राजकीय वातावरण जरी शांत असले तरी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मध्ये मात्र वातावरण तापले असल्याचे दिसून येते...

 श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील रॉयल एजुकेशन सोसायटी मध्ये ट्रस्टीच्या नियुक्ती बाबत सुरु असलेला वाद आता संपुष्टात आला असून २०२२ साली नियमानुसार जी ट्रस्टींची निवड करण्यात आली होती. ती कायम करण्यात आले असल्याचे समजते याबाबत सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे

 रायगड जिल्ह्यातील बोर्ली पंचतन येथे रॉयल एज्युकेशन ट्रस्ट ही साधारण १९८२ रोजी ए आर उंडरे यांनी स्थापन केली होती...

 रॉयल एज्युकेशन सोसायटी ची स्थापना झाल्यापासून मोठ्या प्रमाणात शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असल्याने रॉयल एज्युकेशन सोसायटी च्या आज घडीला रायगड जिल्ह्यात साधारण १४-१५ शाळा सुरु असून या सोसायटीला शैक्षणिक क्षेत्रात मोठं मानाचं स्थान असलेले पाहायला मिळते... अगदी ट्रस्टचा कारभार उंडरे आणि ट्रस्ट च्या कमिटीच्या देखरेखी खाली ट्रस्ट च्या घटनेप्रमाणे व्यवस्थित सुरु असतानाच रॉयल एज्युकेशन सोसायटीची २०१९ साली नवीन कमिटी स्थापन करून सोसायटीचे अध्यक्ष ए आर उंडरे यांची अध्यक्ष स्थानी नेमणूक करण्यात आली होती...

 मसुद दर्जी, फारूक रहेमान, फारूक लोखंडे, हमीदा अब्दुर रहीम उंडरे, मोहसीन अब्दुर रहीम उंडरे, अफजल लादीवाला, अताऊल्ला उंडरे व सय्यद रशीद यांची सोसायटीच्या ट्रस्टि म्हणून २०१९ ते २०२२ साला करिता नेमणूक करण्यात आली...

तर ए आर उंडरे यांचे २०२० रोजी निधन झाल्यानंतर सोसायटीच्या अध्यक्ष म्हणून त्यांच्या पत्नीची ट्रस्ट च्या अध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली आसुन याबाबत धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली होती.

 तर २६ जुन २०२२ रोजी नव्याने ट्रस्टिंची निवड करण्यात आली असता, २०२२ ते २०२५ या तीन वर्षांच्या कालावधीकरिता हमीद उंडरे, मसूद दर्जी, मोहसीन उंडरे,अब्दुल कलाम उंडरे, शाबीर उंडरे, शाकीरा अहम्मद, आयेशा उंडरे, सुफियान उंडरे यांची नव्याने नियुक्ति करण्यात आली होती...

 मात्र यावेळी ए आर उंडरे हायस्कूल बोर्ली पंचतन येथे मुख्यध्यापक म्हणून कार्यरत असलेले अरिफ अन्सारी, आणि लेखापाल म्हणून कार्यरत असलेले मुबीन अराई हे त्यांच्या सोबत अब्दूल कादिर राऊत व इतर काही जण अचानक ऑफिस मध्ये आले असता त्यांनी ट्रस्टीना ट्रस्ट आमची आहे तुम्ही सगळे येथून निघून जा असे म्हणत ऑफिस च्या बाजूला असणाऱ्या एका खोलीत मोहसीन अब्दुल रहीम उंडरे आणि ट्रस्टच्या सदस्यांना  बंद करून ठेवले, आणि जोपर्यंत काही कागदपत्रावर सह्या करीत नाही तो पर्यंत तुम्हाला सोडणार नाही असे म्हणून धमक्या द्यायला सुरुवात केली...

चुकीच्या पद्धतीने अवैध रित्या ट्रस्टी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती..या बाबत सोशल मीडियाचा न्यूजच्या माध्यमातून बातमी प्रकाशित करण्यात आली होती...

तसेच या सर्वांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून देखील सदरचे ट्रस्टी अरिफ अन्सारी, मुबीन अराई, दाऊद राऊत, मुसद्दीक प्रकार, अब्दुल कादिर राऊत, सय्यद इर्फान नाजिरी, सादिक अली राऊत, निसार हसन दर्जी, फैसल मियाजान हुर्जूक, महम्मद अली हे तटकरे यांचे खंदे समर्थक असल्याने त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई होत नव्हती...

 तरी या प्रकरणी ट्रस्ट चे खरे ट्रस्टी असणारे मोहसीन उंडरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षातील कार्यकर्ते तथा  पदाधिकारी यांच्याकडे न्यायासाठी धाव घेतली असता, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या आदेशानुसार तसेच अमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमीर  खानजादा आणि म्हसळा तालुकाअध्यक्ष अझहर धनसे यांनी उंडरे सोसायटी प्रकरणी लक्ष घालून मोहसीन उंडरे यांच्या पाठीशी खंबीर पने उभे राहून लढा देत असताना  या प्रकरणी उच्च न्यायालय मुंबई येथे केस दाखल केली होती...

 नुकतेच धर्मादाय आयुक्त रायगड अलिबाग यांनी सदरच्या रॉयल एज्युकेशन ट्रस्ट मध्ये २६ जुन २०२२ रोजी नियुक्त झालेली ट्रस्टींची निवड योग्य ठरवून रॉयल एज्युकेशन ट्रस्ट बाबत मोहसीन उंडरे यांच्या बाजूने निकाल देत आदेश दिला असल्याने श्रीवर्धन मध्ये निवडणुकी आधीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने विजय मिळविला असल्याचे बोलले जात आहे...

 याचे कारण म्हणजे रॉयल एज्युकेशन सोसायटी हडपण्याचा डाव करणारे सर्वजण हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सुनील तटकरे यांचे समर्थक असून या सर्वाना मात देत मोहसीन उंडरे यांना विजय प्राप्त झाल्याने त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा असणारे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब तसेच अमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमीर खानजादा, म्हसळा तालुकाअध्यक्ष अझहर धनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे श्रीवर्धन उपतालुका प्रमुख जुनेद दुस्ते तसेच या प्रकरणी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार व्यक्त केले...रॉयल एज्युकेशन सोसायटीचा झालेला विजय म्हणजेच रायगड मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा विजय झाला असल्याचे सर्वत्र चर्चा ऐकावयास मिळते...

Post a Comment

Previous Post Next Post