महाराष्ट्र वेदभुमी

किहीम येथे जागतिक महिला दिनानिमित्त हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न,



अलिबाग :अब्दुल सोगावकर

सोगाव : अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायतीने शुक्रवार दि. ८ मार्च रोजी राजिप शाळा किहीम येथे जागतिक महिला दिनानिमित्त हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी किहीम ग्रामपंचायत हद्दीतील सर्व समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या...

         यावेळी किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांनी प्रथमच हा कार्यक्रम भव्य दिव्य असा साजरा करत उपस्थित मान्यवर महिलांचा सन्मान केला. तसेच उपस्थित महिलांना महिला दिनानिमित्त हळदीकुंकुवाचे वाण वाटप केले. या कार्यक्रमाला किहीम आदिवासी वाडी व बामणसुरे आदिवासी वाडी येथील महिला मोठ्या प्रमाणात आवर्जून उपस्थित होत्या...

        या कार्यक्रमाला किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांच्यासह उपसरपंच मिलिंद पडवळ, ग्रामपंचायत सदस्य संतोष किर, दिनेश सोष्टे, ग्रामपंचायत सदस्या जान्हवी वाघे, निधी काठे, नूतन थळे, जागृती झेरंडे, कल्पिता आमले, तसेच स्नेहा आर्ते, ग्रामपंचायत महिला कर्मचारी तृप्ती पाटील, अश्विनी कदम, ग्रामसेवक बाबुराव वनवे तसेच इतर ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होते...

*फोटो लाईन :* किहीम येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित हळदीकुंकुवाच्या कार्यक्रमात सरपंच पिंट्या गायकवाड व सहभागी महिला व मान्यवर,

Post a Comment

Previous Post Next Post