अब्दुल सोगावकर : अलिबाग
सोगाव : अलिबाग तालुक्यातील सोगाव येथील एस.ओ.एस. बालग्रामच्या कुटुंब सशक्तिकरण कार्यक्रमांतर्गत वाघोडे येथे शुक्रवार दि. ८ मार्च २०२४ रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला...
या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेतील पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा व्यवस्थापक जयंतराव गायकवाड, प्रकाशवाटाच्या समुपदेशक प्राची देशमुख, राज्य संचालक महेश एम.व्ही., डी मार्टचे ओंकार कुलकर्णी, वाघोडे सरपंच कृष्णा जाधव, एस.ओ.एस. बालग्रामचे अधिकारी पठाण रियाजखान व सुजय बाजपाई याप्रसंगी उपस्थित होते...
या कार्यक्रमानिमित्त एसएमबीसी संस्था मुंबईच्या सहकार्याने ग्रामपंचायत वाघोडे येथील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या सर्व समाजातील महिलांना सौरदिव्यांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी एस.ओ.एस. भारतीय बालग्रामचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंता कार यांनी संदेशाद्वारे कार्यक्रमाचे उद्दिष्ट व विविध उपक्रम याबाबत सविस्तर माहिती दिली, तसेच उपस्थित मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत एस.ओ.एस. बालग्राम या संस्थेने पालकत्व गमावलेल्या किंवा गमावण्याच्या जोखमीवर असलेल्या मुलांसाठी तसेच आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांना सक्षम करण्यासाठी कौतुकास्पद कार्य करत असल्याबद्दल कौतुक केले...
फोटो लाईन : एस.ओ.एस. बालग्राम सोगाव तर्फे वाघोडे येथे महिला दिनानिमित्त कार्यक्रमात उपस्थित महिला व मान्यवर,
