माणगाव प्रतिनिधी: सिकंदर आंबोणकर
गोरेगाव गावतालावा लागत असलेली सार्वजनिक बांधकाम खात्याचा (सर्वे नं. १९७) या जागेची दि.१८ मार्च २०२४ रोजी सरकारी मोजणी करण्यात आली असून,ही जागा सार्वजनिक बांधकाम खात्याची असल्याचे निष्पन्न झाले आहे...
गोरेगाव गावतालावा लगत,अनधिकृतपणे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेत बांधकाम करण्यात आले असून या जागेत अतिक्रमण करण्यात आले आहे.या जागेची सरकारी मोजणी करून हद्द कायम करण्याकरिता पत्रकार प्रसाद गोरेगावकर यांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम खात्यात पत्र्यावर करून शासकीय जागा वाचविण्यासाठी दि.२६ जानेवारी २०२४ रोजी उपोषण देखील केले होते.यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता श्री.गणगणे यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे दि.१८ मार्च २०२४ रोजी मोजणी करण्यात आली...
या मोजणी दरम्यान सदर जागा सार्वजनिक बांधकाम खात्याचीच असल्याचे सिद्ध झाले असून,शासकीय जागा वाचविण्यासाठी निर्भीड पत्रकार प्रसाद गोरेगावकर यांच्या एकाकी लढ्याला यश आले असून गोरेगाव नगरी,पंचक्रोशी तसेच तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्ष होत आहे...
सदर सरकारी मोजणी दरम्यान सा.बा.उपविभाग माणगावचे सहाय्यक अभियंता,शिपाई तसेच भूमिअभिलेख कर्मचारी, प्रसाद गोरेगावकर व गोरेगाव चे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...
