महाराष्ट्र वेदभुमी

आ नितेश राणे यांच्या भडकाऊ भाषणाविरुद्ध खा सुनील तटकरेंकडे कारवाईची मांगणी -रशाद करदमे!



शहानवाज मुकादम/रोहा

मो.7972420502(७९७२४२०५०२)

भाजप आणि राज्य सरकार याला पाठीशी घालून अशा वक्तव्यांचे समर्थन तर करत नाही ना?

रोहा:दि:०७ मार्च २०२४,रोजी अमदार नितेश राणे यांच्या भडकाउ भाषणा विरुद्ध कारवाई होणे बाबत खा सुनील तटकरे आणी संबंधित विभागाकडे कारवाईची मागणी मानव अधिकार मिशन रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष रशाद करदमे यांच्याकडून करण्यात आली...

भाजप आ नितेश राणे सध्या मुंबई मध्ये सर्वत्र सभा घेत असुन नेहमी मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द आणि शिवीगाळ करून मुंबईमध्ये समाजात तेड निर्माण करुन समाजाच्या धार्मिक भावना दुखावत आहे...

 तसेच नितेश राणे आपल्या भडकाऊ भाषणामध्ये न्याय व्यवस्थे बद्दल आणी सरकारी अधिकारी वर्गा बद्दल सुध्दा अपशब्द वापरत असतो.

 नुकताच मीरा रोड मधील झालेली हिंदु मुस्लिम वादाचे काळोख संपले नसतानाच त्यात अजून हिंदु मुस्लिम तेड निर्माण करण्यास नितेश राणे हा प्रेरित करीत आहे,मुस्लिम समाज हा नेहमी न्याय व्यवस्थेस सहकार्य करीत आलेला आहे...


"तोंडावर आलेला रमजानचा पवित्र महिना आणि निवडणुका पाहता विकृत बुद्धी असणारा नितेश राणे हा पोलीस प्रशासनास मोकाट पणे आव्हान करीत असल्याचे दिसुन येत आहे"

 अशा ह्या विकृत मनोवृत्ती ठेवणाऱ्या आमदार नितेश राणे विरुद्ध  योग्यती कारवाई होण्यास खासदार सुनील तटकरे यांना मानव अधिकार मिशन रायगड जिल्हा अध्यक्ष रशाद करदमे यांनी पत्र व्यवहार केला आहे...

 सदर तक्रारीची प्रत पोलीस अधिक्षक रायगड, उप विभागीय अधिकारी श्रीवर्धन, तहसीलदार श्रीवर्धन, पोलीस निरीक्षक श्रीवर्धन यांना देण्यात आली आहे...मुस्लिम समाजाविरोधात केलेले वक्तव्य गंभीर आणि भयंकर आहे... समाजात दुफळी निर्माण करण्याचा हा त्याचा प्रयत्न आहे... मुस्लिम समाजाकडून आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करत असून त्याच्या पक्षाने व नेत्यांनी त्याला समज देऊन रोखले पाहिजे,

 तसेच सरकारने देखील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे,राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खा सुनील तटकरे यांच्याकडून भाजप आमदार नितेश राणे विरुद्ध कारवाई होण्यास तटकरे कडून काय दखल घेण्यात येईल हे पाहावयास मिळणार आहे...


पिढ्यानपिढ्या दोन्ही समाज येथे शांततेत आणि एकोप्याने राहत आहे...कोकणाला आणि महाराष्ट्राला तर हिंदू-मुस्लिम ऐक्याची एक मोठी परंपरा आहे..

 मग आमदार नितेश राणेंना गरळ ओकण्याची गरजच काय?नेमके त्यांना काय साद्य करायचे आहे?असे अनेक प्रश्न उपस्थित  होत आहे...मुस्लिम समाज रस्त्यावर आला तर परत जाणार नाही, हे राणेंचे वक्तव्य म्हणजे धमकी नव्हे का?

 खुलेआम धमक्या,शिवीगाळ आणि दोन समाजात तेड निर्माण करणारे वक्तव्य करत असल्याने नितेश राणे याला आमदार पदी राहण्याचा अधिकार आहे का? सरकारने त्याच्यावर कारवाई करणे अपेक्षित असुन सरकार आ आणि त्याचा पक्ष व पक्षनेते देखील याबाबत बोलत नाहीत,याचा अर्थ काय?

"माझा बॉस सागर बंगलयावर आहे असे वक्तव्य जगजाहीर नितेश राणे करतो, तर दुसरीकडे आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करतो यांना अभय कोणाचा?"

भाजप आणि राज्य सरकार त्यांना पाठीशी घालून अशा वक्तव्यांचे समर्थन तर करत नाही ना?आमदार नितेश राणे याच्याकडून असे वक्तव्य जर सातत्याने होत राहिले, तर ते देशाला आणि लोकशाहीला घातक ठरेल... मुस्लिम समाजच नव्हे तर कोणत्याही समाजाच्या बाबतीत असे वक्तव्य होऊ नये...

राज्याचे मुख्यमंत्री आणी गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सदर विषयी दखल घेणे आवश्यक आहे...

Post a Comment

Previous Post Next Post