महाराष्ट्र वेदभुमी

महिलादिनाचे औचित्य साधुन न्यायाधीश अमृता शिंदे यांचे मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन.

 

अलिबाग (ओमकार नागावकर) : 

महिला दिनाचे औचित्य साधत अधिवक्ता परिषद अलिबागतर्फे सोमवार दि.११ मार्च रोजी जिल्हा न्यायालयातील वकील कक्षामध्ये कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश अमृता अमोल शिंदे यांचे मार्गदर्शन व्याख्यान आयोजित केले होते. महिलांविषयक कायदे या विषयाचे अनुषंगाने उपस्थित वकील वर्गाला बहुमूल्य मार्गदर्शन केले....

           यावेळी न्यायाधीश शिंदे यांचेसह व्यासपीठावर अधिवक्ता परिषदेच्या अधिवक्ता श्वेता जोशी, अधिवक्ता सुलभा पाटील, अधिवक्ता वैशाली बंगेरा उपस्थित होत्या... व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय अधिवक्ता नेहा तांबट यांनी करून दिला... या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिवक्ता तनुष्का पेडणेकर यांनी केले... उपरोक्त महिला वकिलांसह अधिवक्ता गीता पवार, स्मिता धुमाळ, सिमीन पाटील, नीलांबरी नाईक, वैशाली भालकर, रिटा सोळंकी, सीमा घरत, सरस्वती पाटील, उत्तरा मयेकर यांचा कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग होता...

          या कार्यक्रमांमध्ये अलिबागमध्ये वकिली करणाऱ्या व ज्यांची सनद २५ वर्षांपूर्वीची आहे अशा महिला वकिलांचा सन्मान करण्यात आला... याप्रसंगी अधिवक्ता नीला तुळपुळे,  निहा राऊत, स्वाती लेले, भारती काळण, प्रतिमा हातणकर,  श्वेता जोशी, स्वाती कुलकर्णी, मानसी म्हात्रे, विभा मेहता यांना श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले... सन्मानमूर्तींच्या कार्याचा परिचय अधिवक्ता पल्लवी तुळपुळे यांनी करून दिला...या कार्यक्रमात आभार प्रदर्शन अधिवक्ता अदिती चांदोरकर यांनी केले... कार्यक्रमाला अलिबाग मधील वकील श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला...

Post a Comment

Previous Post Next Post