विशेष प्रतिनिधी: मुंबई
मुंबईतील दहिसर विभागातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घोसाळकर बोरीवले पश्चिमेत आपल्या वॉर्डात नागरिकांच्या भेटीगाठी घेत होते त्याचवेळी अज्ञाताने अभिषेक घोसाळकर यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे... त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे...मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.अभिषेक घोसाळकर यांना दहीसरमधील करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने अखेर मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून संगण्यात आले.तर ही माहिती मिळताच रुग्णालयाबाहेर एकच गर्दी आहे ..
शिवसेना नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा अभिषेक मुलगा आहे. याच्यावर चार ते पाच गोळ्या झाडल्या आणि अधिक रक्त सराव झाल्याने त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे...
