महाराष्ट्र वेदभुमी

वायशेत येथील स्व.मा.आ.मधूशेठ ठाकूर स्मृती चषक २०२४ च्या कबड्डी स्पर्धेत शिवाई बांधण विजयी,


सोगाव - अब्दुल सोगावकर : 

अलिबाग तालुक्यातील वायशेत येथे स्व.मा.आ मधूशेठ ठाकूर स्मृती चषक २०२४ च्या जय हनुमान क्रीडा मंडळ व ग्राम विकास मंडळ, वायशेत यांच्या संयुक्त विद्यमाने व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भव्य जिल्हास्तरीय खुल्या गट कबड्डी स्पर्धांचे रविवार दि. ११ फेब्रुवारी २०२४ रोजी कै. अनुसया दत्ताराम पाटील क्रीडानगरी, जय हनुमान क्रीडा मंडळ वायशेत येथील भव्य मैदानावर आयोजित करण्यात आल्या होत्या...

          जय हनुमान क्रीडा मंडळ व ग्राम विकास मंडळ, वायशेत-अलिबाग हे गेली १९९४ पासून ते २०२४ पर्यंत कोरोना कालखंड वगळता सातत्याने व मोठ्या उत्साहात कबड्डी स्पर्धांचे आयोजन करत आहेत. या वायशेत येथील प्रत्येक वेळी स्पर्धेला प्रथम क्रमांक कै. प्रभाकर राणे यांच्या स्मरणार्थ अभिजीत राणे आणि रणजीत राणे यांजकडुन स्पर्धा चालू केल्यापासून आजपर्यंत पारितोषिक व चषक देण्यात येत आहे. तर विशाल गुळेकर, खान शेठ व जिगर शेठ यांचे वेळोवेळी सहकार्य मिळाले आहे...

            या मंडळाने रविवार दि.११ फेब्रुवारी रोजी भव्य कबड्डीच्या स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांचे उद्घाटन रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे कार्यालयीन चिटणीस प्रभाकर राणे यांच्याहस्ते व रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे, विराज निवास भगत व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले...

           या कबड्डी स्पर्धांना सदिच्छा भेट व प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सचिव ऍड प्रविण ठाकूर, अलिबाग नगरपरिषद माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, सातिर्जे ग्रामपंचायतीचे उपसरपंच उमेश ठाकूर, समीर(उनी) ठाकूर, रायगड जिल्हा शिवसेना संघटक(उद्धव ठाकरे गट)आमिर(पिंट्या) ठाकूर, धोकवडे सरपंच प्रशांत गावंड, किहीम सरपंच पिंट्या गायकवाड, आगरसुरे सरपंच जगन्नाथआप्पा पेढवी, मुळे ग्रामपंचायत उपसरपंच राकेश पाटील, किहीम उपसरपंच मिलिंद पडवळ, ऍड प्रसाद पाटील, ऍड अनंत पाटील, जगदीश पाटील, अजित म्हात्रे, डॉ. कैलास चेऊलकर, डॉ. सुभाष म्हात्रे, मापगाव माजी उपसरपंच अशोक नाईक, कुरुळ येथील उद्योजक समीर पाटील, मनोहर म्हात्रे, महेश पडते, शिवप्रसाद तोडणकर, विजय आंबेतकर, पांडूशेठ, राष्ट्रीय खेळाडू दिलीप धुमाळ, विश्वनाथ पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी, मिलिंद पाटील, प्रफुल्ल पाटील, जगदीश बारे, अजय म्हात्रे, राजु शिंदे, अवधुत नाईक, महेंद्र पाटील, मुरतुज मुजावर, संतोष हाके, विकास काटे, शैलेश घरत आदी मान्यवर उपस्थित होते...

           अंतिम सामना शिवाई बांधण विरुद्ध ओमकार वेश्वी या संघामध्ये झाला, मात्र अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत शिवाई बांधण संघाने बाजी मारली व प्रथम क्रमांक पटकावला तर ओमकार वेश्वी संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले, तसेच स्पर्धेत तृतीय क्रमांक दर्यावर्दी बंदर नागाव संघाने पटकावला आणि चतुर्थ क्रमांक मातृछाया कुर्डूस संघाने पटकावले. यासोबतच उत्कृष्ट पकड म्हणून दर्यावर्दी बंदर नागाव संघाचा मंथन सुर्वे याचा सत्कार करण्यात आला तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून शिवाई बांधण संघाचा राज जंगम याला सन्मानित करण्यात आले, तसेच पब्लिक हिरो म्हणून ओमकार वेश्वी संघाचा अनुराग सिंग याला गौरविण्यात आले...

            यावेळी बक्षीस वितरण सर्व विजेत्या संघांना व उत्कृष्ट खेळाडूंना मनोहर पाटील, द्वारकानाथ पाटील, दत्ताराम पाटील यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच यावेळी विशेष म्हणजे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वजनी बोकड पारितोषिक म्हणून देण्यात आले...

         स्पर्धेत लाईट व्यवस्था भाल येथील एकविरा डेकोरर्ट्सचे संदिप पाटील यांनी केली तर प्रेक्षकांना घरबसल्या लाईव्ह व्हिडीओ पाहता यावी यासाठी स्वप्नील पाटील, निखिल म्हात्रे, कल्याण हाके यांनी केली होती, तसेच रात्रीच्या प्रकाशझोतात सामने पाहण्यासाठी कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी हॅलोजन व्यवस्था प्रणव नाईक यांनी केली...

         स्पर्धेत सूत्रसंचालन व समालोचन संजय पोईलकर, संजय म्हात्रे यांनी केले. स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी खेळाडू व प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती... स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जय हनुमान क्रीडा मंडळ व ग्राम विकास मंडळ वायशेतच्या सर्व कार्यकर्त्यांनी तसेच वायशेत ग्रामस्थांनी अपार मेहनत घेतली...

फोटो लाईन :पहिल्या चित्रात - वायशेत कबड्डी स्पर्धेत शिवाई बांधण या विजयी संघाला पारितोषिक व चषक देताना मान्यवर, दुसऱ्या चित्रात : वायशेत कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना बोकड म्हणून पारितोषिक देताना मान्यवर,

Post a Comment

Previous Post Next Post