महाराष्ट्र वेदभुमी

जय मल्हार मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ अंतोरे-पेण आयोजित कबड्डी स्पर्धेत नवतरुण कारावी संघ विजयी,



सोगाव /अलिबाग अब्दुल सोगावकर :

 जय मल्हार मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ अंतोरे, पेण यांनी शुक्रवार दि.९ फेब्रुवारी रोजी  रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने मर्यादित व आमंत्रित संघांचे भव्य दिव्य कबड्डी स्पर्धांचे जय मल्हारचे भव्य मैदान, क्रिकेट मैदानाजवळ मु. अंतोरे, पो. कोप्रोली, ता पेण येथे आयोजन केले होते...

कबड्डी स्पर्धेला किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी दिली सदिच्छा भेट


  या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या आतषबाजीत करण्यात आले...कबड्डी स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी अलिबाग तालुक्यातील किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी सदिच्छा भेट दिली असता मंडळाने त्यांचा शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले...तसेच पेण तालुक्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्पर्धेला सदिच्छा भेट देत प्रोत्साहन दिले...

           या जय मल्हार अंतोरे पेण आयोजित जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेत नवतरुण कारावी संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक श्री हनुमान बोरी संघाने पटकावला,तृतीय क्रमांक नवकिरण भेंडखळ संघाने पटकावले,

तसेच चतुर्थ क्रमांकबशिवशंभो पाटणेश्वर संघाने पटकावले. यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू चा मान मिथुन मोकल याला देण्यात आला तर उत्कृष्ट पक्कड म्हणून सिद्धार्थ ठाकूर या सन्मानित करण्यात आले, तसेच उत्कृष्ट चढाई करणारा खेळाडू म्हणून निखिल म्हात्रे गौरविण्यात आले, तर पब्लिक हिरो म्हणून यश पाटील याचा गौरव करण्यात आला... स्पर्धा पाहण्यासाठी पेण तालुक्यासह इतर तालुक्यातील मान्यवर नागरिक व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते... स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली...

फोटो लाईन :

पहिल्या चित्रात - जय मल्हार मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ अंतोरे, पेण आयोजित स्पर्धेत नवतरुण कारावी संघाला प्रथम क्रमांक पारितोषिक देताना मान्यवर,

Post a Comment

Previous Post Next Post