सोगाव,अलिबाग - अब्दुल सोगावकर :
अलिबाग तालुक्यातील मूनवली येथे शेतकरी कामगार पक्ष चषक २०२४ आयोजित क्रिकेट स्पर्धेत दादरेश्वर जांभूळपाडा संघ विजयी होऊन प्रथम क्रमांक पटकावला...
या स्पर्धा शनिवार दि. १०,११ व १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मूनवली येथील क्रिकेट मैदानावर आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य वसीम कुर, ग्रामपंचायत सदस्य विजय भगत यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले...
या स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील नामांकित संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत एकूण २४ संघांनी सहभाग घेतला होता. यावेळी अंतिम सामना दादरेश्वर जांभूळपाडा संघ विरुद्ध गावदेवी झिराड संघ यांच्यात अटीतटीच्या लढतीत दादरेश्वर जांभूळपाडा संघ विजयी होऊन प्रथम क्रमांक ५०,००० रुपये पुरस्कार व चषक पटकावला तर गावदेवी झिराड संघाने द्वितीय क्रमांक २५,००० रुपये पुरस्कार व चषक पटकावला, तसेच तृतीय क्रमांक जय हनुमान मूनवली संघाने १५,००० हजार रुपये पुरस्कार व चषक पटकावला. यावेळी उत्कृष्ट फलंदाज म्हणून साई झिराड संघाचा कु. साहिल याला सन्मानित करण्यात आले, तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून दादरेश्वर जांभूळपाडा संघाचा शुभम धसाडे याचा गौरव करण्यात आला. तसेच मालिकावीर म्हणून जय हनुमान मूनवली संघाचा आदित्य भगत याला गौरविण्यात आले...
सर्व विजेत्या संघांना व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य वसीम कुर, मापगाव ग्रामपंचायत सदस्य विजय भगत, मुशेत येथील सामाजिक कार्यकर्ते जगदीश सावंत, मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अशोक नाईक, माजी ग्रामपंचायत सदस्य मजीद कुर, जगन्नाथ पाटील, मुद्स्सर कुर, इलियास हाफिज, जगदीश बारे, संदेश पाटील, गोविंद अनमाने, सुनिल अनमाने, दिलिप मोंढे, संजय सोनावणे, प्रकाश गुळेकर, मनिष म्हात्रे, गितेश करळकर, किफायत कुर, राजेश परब,संतोष भगत, अनंत सकरे, प्रभाकर मोहिते यांच्याहस्ते तसेच पुष्पा कदम, प्रेरणा गुळेकर, अनिता सोनावणे, ज्योत्स्ना भगत, आदिती हरवडे, शुभांगी भगत, स्वाती भगत, विशाखा पवार, रेश्मा भगत, पूजा भगत, साक्षी कदम, मिनल कदम, आयुष गुळेकर, श्रावणी भगत, जिज्ञासा जाधव व इतर मूनवली महिला मंडळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार व चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी मूनवली, सोगाव पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक व क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते...
स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली... स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जय हनुमान मंडळ मूनवली संघाच्या सर्व खेळाडूंनी व मूनवली ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली... स्पर्धेत सूत्रसंचालन अजित हरवडे सर यांनी केले व क्रिकेट समालोचन कुलाबा जीवन गौरव पुरस्कार विजेते संजय म्हात्रे यांनी उत्तमरीत्या करत उपस्थितांची मने जिंकली... स्पर्धेत लाईट व स्पीकरची व्यवस्था महेश तिर्लोटकर यांनी केली, तर डिजेद्वारे निल तिर्लोटकर, श्रावणी भगत, जिज्ञासा भगत यांनी खेळाडूंचे व प्रेक्षकांचे मनोरंजन केले...
या क्रिकेट स्पर्धेसाठी मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य वसीम कुर यांनी स्वखर्चाने उत्कृष्ट खेळपट्टी(पिच)बनवून दिल्याबद्दल मूनवली ग्रामस्थांनी विशेष आभार मानले...
फोटो लाईन :मूनवली येथे शेतकरी कामगार पक्ष चषक २०२४ आयोजित क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्या दादरेश्वर जांभूळ पाडा संघाला पारितोषिक देतांना मान्यवर,
