महाराष्ट्र वेदभुमी

श्रीकाळभैरव क्रिडा मंडळ बोरघर रोहा क्रिकेट स्पर्धेत रोहा रॉयल्स संघ अंतिम विजेता



बोरघर रोहा (दिनेश भगत) 

रोहा तालुक्यातील श्री धावीर  असोसिएशन च्या मान्यतेने तसेच श्री काळभैरव क्रीडा मंडळ बोरघर रोहा यांच्या वतीने मर्यादित क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदरच्या स्पर्धेत अंतीम फेरीचा सामना हा रोहा रॉयल्स विरुद्ध आझाद अष्टमी यांच्यात मोठ्या चुरशीचा व अटीतटीचा झाला असून अखेर रोहा रॉयल्स संघाने आझाद अष्टमी संघाला पराजीत करून विजय प्राप्त केले तर अष्टमी संघाला अखेर उपविजेता ठरला.तृतीय क्रमांक मोहल्ला फायटर्स आणि चतुर्थ क्रमांक धनगर आळी रोहा या संघाने बाजी मारत विजेतेपद पटकावले...


बोरघर रोहा येथील श्री कालभैरव मैदानावर रंगलेल्या या क्रिकेट स्पर्धेचे शुभारंभ आनंता चव्हाण, महेश भगत,दिनेश भगत यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी बहुसंख्येने श्री धाविर क्रिकेट असो.क्रिकेट खेळाडू व रसिक प्रेक्षक उपस्थित होते.तर मोठ्या उत्साही वातावरणात पार पडलेल्या या खेळातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणुन मालिकावीर - सलमान ( रोहा रॉयल्स) उत्कृष्ट फलंदाज - सुहेल (आझाद अष्टमी) उत्कृष्ट गोलंदाज - दिशांत  (धनगर आळी) है ठरले यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला...

या स्पर्धेच्या बक्षीस समारंभास बोरघर गावातील मराठी उद्योजक व रांका ज्वेलर्सचे मॅनेजर नरेशदादा ठाकुर त्यांच्या समवेत दिनेश भगत, अनंता चव्हाण, मंगेश भगत,केशव माने शरद चव्हाण, महेश भगत, मोरेश्वर मोरे, अनिल भगत विजय भगत संतोष भगत मयुर चव्हाण विठ्ठल भगत नरेश भगत भाई मोरे, योगेश भगत, संतोष माने परशुराम माने सह आदी मान्यवरांच्या उपस्थित तथा यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले...

तसेच आयोजीत करण्यात आलेल्या या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सदस्य योगेश भगत, जयदीप भगत, जयेश भगत, शिरीष भगत, अक्षय भगत, दिव्येश भगत, शुभम भगत, योगेश भगत, सागर भगत, अनिकेत भगत, रोहन भगत,ऋतिक शिंदे आकाश भगत ओमकार भगत आदींनी अथक परिश्रम घेत तरुणांचे आधारस्तंभ दिनेश भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना उपस्थित मान्यवर आदी खेळाडूंनी त्यांना शुभेच्छा दिल्या...

Post a Comment

Previous Post Next Post