महाराष्ट्र वेदभुमी

आ स्व.पा.रा.सानप यांची २९ वी पुणयतिथी कोलाड येथे मोठ्या उत्साहात.


खांब (नंदकुमार कळमकर ) 

कुणबी समाज नेते माजी आमदार स्व.पा.रा.सानप यांची २९ वी पुणयतिथी कोलाड आंबेवाडी नाका ग्रूप ग्राम पंचायत आंबेवाडी सभागृहात कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामीण शाखा रोहा विभागीय ग्रूप कोलाड यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तर प्राथमिक शाळा संभे व आंबेवाडी तेथील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणीक साहित्य वाटप करण्यात आले...

यावेळी कुणबी समाज नेते तथा माजी उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष शंकरराव म्हसकर, रायगड जिल्हा कुणबी समाज सरचिटणीस शिवराम महाबले, रोहा तालुका उपाध्यक्ष मारुती खांडेकर, ॲड सुनील सानप, मुंबई संघाचे उपाध्यक्ष सुनील ठाकूर,नारायणराव धणवी, प्रवीण गांधी, कोलाड विभाग कुणबी समाज अध्यक्ष संदेश लोखंडे, राजेश कदम, नरेश बिरगावले,संजय कूर्ले,मारूती मालुसरे, पाटेकर गुरुजी, पांडुरंग सानप, अजय कापसे,अरुण आगळे, डॉ श्याम भाऊ लोखंडे, नंदकुमार कळमकर,पाले गावचे पोलिस पाटील बाकाडे,किसन पडवळ,दिवाण सानप, विनायक चितळकर, तुकाराम सानप, दगडु बामुगडे, चंद्रकांत लोखंडे, रवी मामुलस्कर, संतोष निकम,आदी कुणबी समाज बांधव आणि सानप कुटुंब आदी विभागातील कुणबी समाज बांधव तथा त्यांचे हित चिंतक बहुसंख्येने या प्रसंगी उपस्थित होते...

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने तसेच गणेश पूजन शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे तसेच स्व.पा. रा.सानप यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्प मालिका अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करून करण्यात आली.तसेच सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश बिरगावाले यांनी केले तर प्रास्तविक अजय कापसे यांनी केले त्याच बरोबर समाज नेते शंकराव म्हसकर, मारूती खांडेकर, शिवराम महाबले, ॲड सुनील सानप, संजय कुरळे, सुनील ठाकूर,अरुण आगळे,पाटेकर, पोलिस पाटील बाकडे,आदी उपस्थितीत मान्यवरांनी कुणबी समाज नेते स्व.सानप यांचे जीवन चरित्र तसेच त्यांनी केल्याल्या समाज कार्याविषयी मोलाचे मार्गदर्शन करत आदरांजली वाहिली तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विभागीय अध्यक्ष संदेश लोखंडे यांनी मनोगत व्यक्त करत केले...

तसेच सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोलाड कुणबी ग्रुप चे सर्व पदाधिकारी व स्व. पा रा सानप यांचे नातू दिनेश आणि विजय सानप यांनी अथक परिश्रम घेतले...

Post a Comment

Previous Post Next Post