कोलाड ( श्याम लोखंडे )
: रोहा तालुक्यातील मोरया ११ खांब यांच्या वतीने संपन्न करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेतील मानकरी गावदेवी नडवली हा संघ ठरला आहे...
खांब विभाग क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने खांब च्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत मोठ्या संख्येने विभागातील तसेच असो.क्रिकेट संघांनी सहभाग नोंदवला तर रंगलेल्या स्पर्धेतील अंतीम अटीतटीच्या लढतीतील गावदेवी नडवली विरुद्ध भाई भाई खांब यामध्ये अखेर गावदेवी नडवली संघाने बाजी मारत ठरला स्पर्धेतील अंतिम विजेता...
खांब विभागीय क्रिकेट असोसिएशन च्या मान्यतेने मोरया ११ खांब आयोजित सामन्यांमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो गावदेवी नडवली तर उप विजेता ठरला भाई भाई खांब संघ तसेच संघातील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो यंगस्टार देवकान्हे संघ तर संघातील मालिकावीर संदेश मोहिते उत्कृष्ठ फलंदाज जितेश भोईर गोलंदाज ठरला रोहित खामकर यांना उपस्थित मान्यवरांच्या वतिने तसेच आयोजकांच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले...
तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खांब संघाच्या तसेच खांब असो. सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले...