महाराष्ट्र वेदभुमी

एच.डी.एफ.सी बँक माणगाव शाखेच्या बनवट सोने तारण प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात ३ आरोपीनं विरोधात गुन्हा दाखल



माणगाव प्रतिनिधी सिकंदर आंबोणकर 

दि.०७/०२/२०२४ रोजी  माणगाव पोलीस ठाण्यामध्ये एच.डी.एफ.सी बँकेचे सोनेतारण पर्सनल बँकर श्री.किरण सुरेश कांबळे वय वर्ष २९ यांनी फिर्याद दिली असून आरोपी रूपेश सुरेश पितळे,रा.गोरेगाव,ता. माणगाव,राकेश चंद्रकांत इस्वलकर रा.गवळआळी, गोरेगाव,ता.माणगाव, राजेंद्र सहदेव भोजने रा.चिचवली, गोरेगाव -माणगाव ह्यांनी संगनमत करून ४३.०८० मिली.ग्रॅम,५२.६५ मि.ली.ग्रॅम,४४.०८० मिली ग्रॅम,४१.५६ मिली ग्रॅम वजनाचे पिवळ्या धातूच्या चैन बनावट सोने तारण ठेवून त्याच्यावर कर्ज मागणी करून बँकेची फसवणूक करत असल्याचा प्रयत्न करीत असल्याचा बॅकेला निदर्शनास आले..बॅकेने तात्काळ माणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन सदर ३ इसमान बद्दल फिर्याद नोंदविली असून आरोपीन वर भा.द.वि.कलम ४२०,४१८,५११,३४ कलमा अंतर्गत माणगाव पोलीस ठाण्याचे पो.नि.श्री.पाटील,यांच्या आदेशावरून स.पो.नि.श्री.बेलदार, दाखल अंमलदार पोसई श्री.आघाव पुढील तपास करीत आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post