भाग्येश घोसाळकर : रोहा
भाजपने आत्मपरीक्षण करावे- आमदार धैर्यशील पाटील
रायगड लोकसभेचे उमेदवार सुनिल तटकरे हेच असतील- महेंद्र दळवी...रायगड लोकसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने भाजपचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार धैर्यशील पाटील रायगड लोकसभा मतदार संघात जोरदार प्रचार सभा घेत आहेत. तर दुसऱ्या बाजूला विद्यमान खासदार सुनिल तटकरे यांनी देखील रायगड लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे...
रायगड लोकसभा निवडणूक लढविण्याचे विद्यमान खासदार सुनिल तटकरे च हकदार असल्याचे महेंद्र दळवी यांनी म्हटलंय..
भाजप च्या मेळाव्यात उलट सुलट भाष्य होतोय. महायुतीमध्ये सर्व घटक पक्षांनी विचारविनिमय करावा. यामुळे महायुतीत दरार निर्माण होईल. असा सूचक इशारा शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिलाय...
