अब्दुल सोगावकर: अलिबाग
'अलिशान कप' भव्य क्रिकेट स्पर्धांचे प्रविण ठाकूर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन
सोगाव : अलिबाग तालुक्यातील जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत, यामुळे येणाऱ्या पिढीला खेळासाठी मैदानच उपलब्ध नसणार आहेत, मैदान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन मैदाने वाचवावीत, गुरचरण असो वा शासकीय जमिनीत मैदाने निर्माण करा, अन्यथा सगळीकडे काँक्रीटीकरणाचे जंगले तयार होत आहेत, शहरात साधं विरंगुळ्यासाठी व मनमोकळेपणाने फेरफटका मारायला मैदाने नाहीत, म्हणून आपण सर्वांनी मिळून मैदाने वाचवावीत, अलिशान सोगाव मंडळाने क्रिकेट स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले याबद्दल मंडळाच्या सर्व सभासदांचे मी आभार मानून दरवर्षी असेच सामने आयोजित करण्यासाठी शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी अलिबाग तालुक्यातील सोगाव येथील 'अलिशान सोगाव क्रिकेट मंडळाने 'अलिशान कप २०२४' चे भव्य प्रकाशझोतातील दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले होते... यावेळी जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले...
सोगाव येथील क्रिकेट मैदान येथे अलिशान सोगाव क्रिकेट क्लब तर्फे 'अलिशान कप २०२४' या स्पर्धेचे पर्व ११ वे मर्यादित षटकांचे ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट स्पर्धांचे शुक्रवार दि. २ व शनिवार दि. ३ फेब्रुवारी २०२४ रोजी दोन दिवस भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे...
शुक्रवार दि. २ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी या भव्य क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सचिव ऍड. प्रविण दादा ठाकूर यांच्याहस्ते व रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुनिल थळे, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांच्यासह रायगड जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, रायगड जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष अखलाख शिलोत्री, अलिबाग तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष भास्करराव चव्हाण, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे चिटणीस प्रभाकर राणे, सोगाव येथील ज्येष्ठ समाजसेवक रईस भाई खान, कुतुबुद्दीन कप्तान, गुरुवर्य चांदोरकर सर, तसेच माजी रा.जि.प.पक्षप्रतोद काका ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेस सेवा फाउंडेशन अध्यक्ष उमेश ठाकूर, समीर ठाकूर, रविंद्र(नाना) ठाकूर, आगरसुरे सरपंच जगन्नाथ पेढवी, रायगड जिल्हा (उद्धव ठाकरे गट)शिवसेना संघटक आमिर(पिंट्या) ठाकूर, मापगाव माजी उपसरपंच समद कुर, मापगाव विभाग सरचिटणीस विवेक जोशी, बहिरोळे पोलीस पाटील प्रफुल्ल थळे, सातिर्जे माजी सरपंच प्राची ठाकूर, मापगाव ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत खोत, किशोर सातमकर, अक्षय जाधव, ग्रामपंचायत सदस्या सानिका घाडी, अनिल जाधव, संजय शिंदे, सूचित थळे, शलाका थळे, सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी, सुरेश राऊत, दत्ता भगत, दत्ता पाटील, अशोक पाटील, मुरतुजा कुर, नजीर कुर, जलील पठाण, मैनुद्दीन अन्सारी, मन्सूर कुर, रुस्तुम कुर, नवाज आराई, सुधाकर ठकरूळ, राजेंद्र घरत, हनुमान माने, पांडुरंग माने, व इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सर्व मान्यवरांचे अलिशान सोगाव मंडळातर्फे शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले...
या स्पर्धेत एकूण २४ संघांनी सहभाग घेतला आहे, त्यातील पहिला सामना अमृत इलेव्हन सासवणे व कै. किसन थळे पुरस्कृत झिराड यांच्यामध्ये नाणेफेक होऊन नाणेफेक अमृत इलेव्हन सासवणे यांनी जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, यामध्ये कै. किसन थळे पुरस्कृत झिराड संघाने ५१ धावांचे लक्ष्य केले, या धावांचे लक्ष्य अमृत इलेव्हन संघाने सहजतेने पार करत विजय मिळविला...
या आयोजित क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुक्यातील व सोगाव पंचक्रोशीतील प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने रात्री उशिरापर्यंत उपस्थित होते... हे सामने पाहण्यासाठी क्रिकेट खेळाडूंची व क्रिकेट प्रेमींची मोठी गर्दी झाली होती. मंडळाने गर्दीच्या दृष्टीने चोख व्यवस्था केली आहे... स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अलिशान सोगाव मंडळाचे कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत...
१)कोट : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सचिव ऍड. प्रविण दादा ठाकूर -अलिशान सोगाव मंडळाने अतिशय नियोजनबध्दरित्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले आहे, या सामन्यांचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले याबद्दल मी मंडळाचा आभारी आहे... या मंडळाने यापुढेही मंडळाचे अध्यक्ष लाईक कप्तान यांच्या उपस्थितीत असेच भरगच्च सामने आयोजित करण्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो...
२) कोट: रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुनिल थळे - अलिशान सोगाव क्रिकेट मंडळ दरवर्षी भव्य क्रिकेट स्पर्धांचे यशस्वी आयोजन करत आहे, यावर्षी देखील तितक्याच जोमाने क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या व त्यांचे उद्घाटन आमच्या हस्ते करण्यात आले, याबद्दल मी अलिशान सोगाव चे आभार व्यक्त करतो, यापुढेही आम्ही सर्व ठाकूर व थळे परिवार पूर्ण ताकदीने आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन देतो, इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या अनेक मान्यवरांना उपस्थित राहिल्याबद्दल विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे, लाईक कप्तान यांचे कार्य खूप मोठे आहे म्हणून मी त्यांना व त्यांच्या मंडळाला शुभेच्छा देतो...
३)कोट : रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर- अलिशान सोगाव मंडळाने इतक्या मोठ्या प्रमाणात क्रिकेट स्पर्धांचे आयोजित केल्या आहेत, सर्व मान्यवरांची व क्रिकेट खेळाडू तसेच रसिकांच्या साठी खूपच छान व्यवस्था केली आहे, याबद्दल मी अलिशान सोगाव मंडळाचे अध्यक्ष व सर्व सभासदांचे आभार मानतो, मी एव्हढ्या कबड्डीच्या व क्रिकेटच्या स्पर्धा पाहिल्या पण इथे २ तासांहून जास्त काळ लोटला तरी पाहुण्यांचे सत्कार समारंभ संपन्न झाला नाही, मी असा सत्कार समारंभ पाहिला नव्हता, लाईक कप्तान यांच्या नावाप्रमाणेच आम्ही सर्व तुम्हाला लाईक करतो, आम्ही सर्व कप्तान कुटुंबियांच्या पाठीमागे आम्ही सर्व ठाकूर व थळे कुटुंब आपल्या पूर्ण पाठीशी आहोत...तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है।
४)कोट : रायगड जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष - मी आजपर्यंत अनेक स्पर्धा पाहिल्या पण अलिशान सोगाव मंडळाने खुपच छान नियोजन व आयोजन केले आहे, याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो,व या सामन्यांसाठी आम्हाला आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो...
५) कोट : रायगड जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर - अलिशान सोगाव मंडळाने अलिशान नावाप्रमाणेच अलिशान क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले आहे, अश्या प्रकारचे क्रिकेट स्पर्धा मी आजपर्यंत पाहिल्या नाही, याबद्दल मी अलिशान सोगाव मंडळाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहेत...
फोटो लाईन : पहिल्या चित्रात अलिशान सोगाव तर्फे 'अलिशान कप २०२४' क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सचिव ऍड. प्रविण दादा ठाकूर, सुनिल थळे, राजाभाऊ ठाकूर व उपस्थित मान्यवर,
दुसऱ्या चित्रात : 'अलिशान सोगाव २०२४' क्रिकेट स्पर्धेत उपस्थित रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महेंद्र घरत यांचे स्वागत करताना मान्यवर,
