रोहा: विशेष प्रतिनिधी
तालुक्यातील ग्रामीण भागातील उडदवणे गावात एका रात्रीत भुरट्या चोरट्यांनी चार घरफोड्या फोडून चोरी झाल्याची घटना घडली आहे. १७ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरांनी एकाच गावात चार घर फोड्या केल्याची घटना घडली असून या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे...
तालुक्यातील उडदवणे गावात सकाळीं चोरी झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली याची माहिती मिळताच रोहा पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली... अलिबाग येथील श्वानपथक आले. पोलीसांनी पथकातील श्वानच्या मदतीने तपास सुरु केला... चोरी प्रकरणी रोहा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक देविदास मुपडे, पोलिस निरीक्षक येदाले यांच्या मार्गदर्शन खाली पोलिस श्रीधर अधिकारी, अतुशोत, म्हात्रे तपास करत आहेत... चोरट्यांनी काही घरात खिडकीतून प्रवेश केल्याचे प्रथम दर्शन पोलिसाना दिसून आले...
वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी हे त्यांचा पुतण्या याचे घरी हळदीच्या कार्यक्रमासाठी गले असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे बंद घराचे हॉलमधील स्लायडींग खिडकीची काच कोणत्यातरी हत्याराने उपकुन त्यावाटे घरात प्रवेश करून किचनरूम मधील लोखंडी कपाटाचे लॉकर कोणत्यातरी हत्याराने तोडुन रूपये १,६०,०००/- किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने फिर्यादी यांचे संमत्ती शिवाय लबाडीच्या इरादयाने स्वतःच्या फायदयाकरीता घरफोडी चोरी करून नेला असल्याची घटना घडली असुन या घटनेची नोंद भादवी कलम ४५७,३८०, प्रमाणे दप्तरी नोंद करण्यात आली आहे...अशी माहिती रोहा पोलिसांनी दिली..
तर सदरच्या घडलेल्या या घटनेचे रोहा पोलिस निरिक्षक मुपडे यांच्या मार्गदर्शाखाली अलिबाग व रोहा पोलिस अधिक समांतर तपास करत असल्याचे सांगितले आहे...
