उरण दि १७(विठ्ठल ममताबादे)
उरण मधील सामाजिक कार्यकर्ते मयूर सुतार हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आजपर्यंत निस्वार्थी वृत्तीने अनेक उपक्रम राबविले आहेत. अनेक गोर गरिबांना मदतीचा हात दिला आहे.गोरगरीब व गरजू मुलांचे शैक्षणिक साहित्य अभावी शिक्षण थांबू नये. विद्यार्थ्यांचे पुढील जीवन प्रकाशमय व्हावे या अनुषंगाने सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यकर्ते मयूर सुतार यांनी समाज प्रबोधन शिक्षण संस्थेच्या चार फाटा ओएनजीसी वसाहत शेजारी असलेल्या महाविद्यालयातील १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना वही पेन, पट्टी,पॅड आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.वर्ग शिक्षका लता ठाकूर यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना कंपासपेटी देण्यात आले .शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.यावेळी समाजप्रबोधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काकासाहेब पाटील, सचिव रविंद्र म्हात्रे,चेअरमन डी.बी.म्हात्रे, व्हाईस चेअरमन म.ठाकूर, डॉ. संजीव म्हात्रे, माजी मुख्याध्यापक शशिकांत म्हात्रे, कल्पेश सुतार, मुकादम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते...सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली...
