महाराष्ट्र वेदभुमी

सोगाव हद्दीतील जीर्ण झालेल्या विद्युत खांब व तारा बदलून नवीन खांब व तारा ..वसीम कुर यांच्या माध्यमातून काम सुरू


अब्दुल सोगवकर :अलिबाग

सोगाव : सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारे व समाजाच्या सामाजिक बांधिलकी साठी प्रत्येक क्षेत्रात झोकून देत सतत कार्यरत असणारे अलिबाग तालुक्यातील सोगाव येथील विकास पुरुष म्हणून ज्यांची ओळख असलेले सामाजिक कार्यकर्ते व मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तसेच विद्यमान सदस्य वसीम कुर यांनी सोगाव पंचक्रोशीतील जीर्ण झालेले विद्युत खांब व तारा बदलून नवीन विद्युत खांब व तारा महावितरण कंपनीकडे पाठपुरावा करून बदलण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. याबद्दल सर्व स्तरातून वसीम कुर यांचे कौतुक होत आहे...

           आपल्या उपसरपंच व सदस्य काळात सोगाव पंचक्रोशीत विविध प्रकारची लोकोपयोगी विकासकामे केली आहेत. सोगाव हद्दीतील बहुतांश जीर्ण झालेले विद्युत खांब व तारा खराब झाल्या होत्या, यामुळे  अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने मी महावितरण कंपनीकडे या भागातील जीर्ण झालेले विद्युत खांब व त्यावरील असणाऱ्या विद्युत वाहक तारा बदलण्याची मागणी केली होती, आपल्या पाठपुराव्यामुळे महावितरण कंपनीने नवीन खांब व नवीन वीज वाहक तारा बदलण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी सोगाव भागातील स्ट्रीट लाईटच्या कमी उजेडाची असणारी दिवे काढून त्याठिकाणी जास्त उजेडाची व विजेची बचत करणाऱ्या हायमॅक्स दिवे स्वखर्चाने बसवून दिले आहेत, यामुळे रात्रीच्या वेळी चांगला उजेडाचा फायदा ग्रामस्थांना होत आहे, याबाबत सर्व ग्रामस्थांनी आभार मानले आहेत, असे वसीम कुर यांनी सांगितले आहे...

यावेळी वसीम कुर, माहीद कुर, .... व सोगाव ग्रामस्थ, विद्युत कर्मचारी व इतर कामगार उपस्थित होते...

फोटो लाईन : सोगाव हद्दीतील जीर्ण झालेले विद्युत खांब व तारा बदलवून घेताना माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य वसीम कुर व इतर,

Post a Comment

Previous Post Next Post