कोलाड (श्याम लोखंडे )
रोहा तालुक्यातील इंग्रजी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मंजुळा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल खांब येथे विद्यार्थ्यांचे वार्षिक विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम मोट्या उत्साह वातावरणात संपन्न झाले...
प्रसंगी यावेळी इंटर नॅशनल लायन्स क्लब ऑफ डिस्ट्रिक्ट ३२३१ ए ४ चे जी एस टी कॉर्डनेटर एम जे एफ लायन प्रवीण सरनाईक, रिजन चेअरपर्सन लायन प्रियदर्शनी पाटील,लायन नयन कवले,बीजाक्षी राय मॅडम , कोलाड लायन्स क्लबचे अध्यक्ष नरेश बिरगावले, हभप नारायण महाराज लोखंडे,संस्थापक अध्यक्ष रवींद्र लोखंडे,मुख्याध्यापिका सौ रिया लोखंडे,उपाध्यक्ष सुधीर लोखंडे, खजिनदार डॉ श्याम भाऊ लोखंडे, संचालक रामचंद्र मोरे, उदय डवले,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा देवकान्हे ग्राम पंचायत उपसरपंच सुरज कचरे, तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायत उपसरपंच संदीप महाडीक, चिल्हे गाव कमिटी अध्यक्ष तुकाराम कोंडे, हभप राम सावंत, पांडुरंग गोसावी, श्रीराम कचरे, सौ पूजा लोखंडे, संतोष महाडिक, सुरेश भोसले, इत्यादी मान्यवर आदी विद्यार्थी,शिक्षक पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थीत होते..
अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी या कार्यक्रमाची सुरुवातीला दीप प्रज्वलन स्वागत गीत पाहुण्यांचे स्वागत तसेच सूत्रसंचालन सौ रुपाली मरवडे यांनी केले तर प्रास्ताविक रवींद्र लोखंडे तर लायन सरनाईक, प्रियदर्शनी पाटील, बिजाक्षी राय मॅडम, डॉ श्याम भाऊ,सुरज कचरे, सुधीर लोखंडे,पांडुरंग गोसावी, हभप राम सावंत आदींनी उत्तम मोलाचे मार्गदर्शन केले...तर या प्रसंगी येथील शाळेतील विद्यार्थी वर्गाने उत्तम आपले विविध कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली..


