महाराष्ट्र वेदभुमी

उरण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुकत्या जाहीर...


उरण दि १(विठ्ठल ममताबादे)

उरण तालुका संपर्कप्रमुख पदी दीपक भोईर व उरण विधानसभा सोशल मीडिया समन्वयक नितीन ठाकूर यांची नियुक्ती

हिंदुह्र्दयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने तसेच शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटिल मार्गदर्शनानुसार जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी उरण तालुका संपर्कप्रमुख पदी दीपक भोईर व उरण विधानसभा सोशल मीडिया समन्वयक  नितीन ठाकूर यांच्या नियुक्या जाहीर केले आहेत, जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी नियुक्ती पत्र देऊन संघटना बांधणीसाठी व पक्ष वाढवण्यासाठी जोमाने कामाला लागा अशा शुभेच्छा दिल्या आहेत, 


यावेळी शिवसेना उपनेत्या ज्योतीताई ठाकरे, मावळ लोकसभा संघटक  संजय वाघेरे, माजी जिल्हाप्रमुख  दिनेश पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, उरण तालुकाप्रमुख  संतोष ठाकूर, पनवेल तालुकाप्रमुख  रघुनाथ पाटील, तालुका संघटक सी बी एन डाकी, युवासेना जिल्हाधिकारी  पराग मोहिते, उपतालुकाप्रमुख  कमलाकर पाटील, उपतालुका संघटक के एम घरत, उरण शहरप्रमुख  विनोद म्हात्रे, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, द्रोणागिरी शहरप्रमुख  जगजीवन भोईर,कामगार नेते गणेश घरत, सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post