महाराष्ट्र वेदभुमी

आदिवासी बांधवाना केलं फ्रेश ज्यूस,लोणचं, दंतकांती टूथपेस्ट आणि पिनट्स बटरचं वाटप !.



उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे)

सारसई येथील बागेचीवाडी आणि आपटा 

दूर-दुर्गम ,डोंगर- दऱ्यांत राहणाऱ्या  आदिवासी बांधावांना विविध सण साजरे करायला सुद्धा खूप काबाड - कष्ट करूनच सण साजरे करावे लागतात त्यातच  घरातील बेताच्या परिस्थिती मुळे तर त्यांचं जगणंच मुश्कील झालेलं असत.अश्यातच त्यांना  लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची काहीतरी मदत करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण व्हावा या करिता ह्या आदिवासी बांधवांच्या सुख- दुःखात ,त्यांच्या हाकेला सदैव धावून  जाणारं व्यक्तिमत्त्व केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर आणि श्री समर्थ कृपा सखी स्वयं सहाय्यता संस्थेच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या संगिताताई ढेरे  आणि डाबर इंडिया कंपनी यांच्या औदार्यातून आपटा सारसई येथील बागेचीवाडी आदिवासीवाडी आणि  आपटा येथील आदिवासीवाडी  या दोन आदिवासी वाड्यांवरील आदिवासी बांधवांनां रिअल फ्रेश फ्रुट ज्यूस,लोणचं, डाबर दंतकांती टूथपेस्ट , पिनट्स बटर वाटप प्रत्येक कुटुंबाला एक एक पाकिटं अश्या प्रकारच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.बागेचीवाडी ह्या आदिवासी वाडीवर आणि आपटा येथील आदिवासी वाडीवरील आदिवासीं फ्रेश फ्रुट ज्यूसचं वाटप करण्याकरिता तिथे उपस्थित सर्व आदिवासी बांधवाना सुद्धा फ्रेश फ्रुट ज्यूस,लोणचं, डाबर दंतकांती कोलगेट, पिनट्स बटर या वस्तूंचे  वाटप करण्यात आले.उपस्थित आदिवासीं समाजातील सामाजिक कार्यकर्ते संतोषदादा सिंघाडे आणि दामूदादा वाघ यांनी प्रथमतः  सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले..वस्तूंरुपी सामान त्या चिमुकल्यानां आणि आदिवासी बांधवाना मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्या जोगा होता.ह्या कार्यक्रमा करिता आदिवासीं महिला भगिनी मोठ्या  प्रमाणात उपस्थित होत्या...

     ह्या सुंदर कार्यक्रमा दरम्यान धनगरवाडा आदिवासी वाडीवरील युवा सामाजिक कार्यकर्ते संतोषदादा सिंघाडे आणि बागेचीवाडी आदिवासी वाडीवरील सामाजिक कार्यकर्ते दामूदादा वाघ यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले. केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर,कॉन संस्थेचे अध्यक्ष स्नेहल पालकर, वेश्वी गावचे सामाजिक कार्यकर्ते विनोददादा पाटील, कॉन संस्थेचे वेश्वी शाखा उपाध्यक्ष सुरेन्द्रदादा पाटील ,अनिल घरत (उरण तालुका सचिव -- आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था), आदिवासी समाजातील युवा सामाजिक कार्यकर्ते संतोषदादा सिंघाडे,दामूदादा वाघ आणि बागेचीवाडी व आपटा आदिवासीवाडी  वरील सर्व आदिवासी बांधवांच्या आणि  चिमुकल्या बाळगोपालांच्यां उपस्थितीत हा सुंदर सोहळा मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.

Post a Comment

Previous Post Next Post