पुगांव - रोहा ( नंदकुमार कळमकर )
रोहा तालुक्यातील वाशी येथे आज पासून किल्ला,धाटाव,रोहा पंचक्रोशीत परमपूज्य स्वानंद सुखनिवासी अलिबागकर बाबा महाराज परमपूज्य स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य गोपाळ महाराज वाजे, परमपूज्य स्वानंद सुखनिवासी धोंडू महाराज कोल्हाटकर यांच्या कृपा आशिर्वादाने व ह.भ.प. नारायण दादा वाजे (मठाधिपती पंढरपूर ), ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज पाटील धाटाव,यांच्या मार्गदर्शनाने मार्गशिर्ष कृ ९.शके १९४५ शुक्रवार दि.५/१/२०२४ ते सोमवार दि.८/१/२०२४ पर्यंत अखंड श्री हरीनाम यज्ञ व श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामुदायिक पारायणाचे आयोजन करण्यात येणार आहे.
यानिमित्ताने दररोज पहाटे ४.३० ते ६.३० वा. काकड आरती,सकाळी ८.०० ते १२.०० व २.०० ते ५.०० वा. ज्ञानेश्वरीचे पारायण,सायंकाळी ५ ते ६ वा.प्रवचन,६.०० ते ७.३० वा हरिपाठ,रात्री ९.३० ते ११.३० हरिकिर्तन नंतर हरिजागारण होईल. तसेच शुक्रवार दि.५/१/२०२४ रोजी ह.भ. प.दिनेश महाराज कडव (वांदोली ) यांचे प्रवचन,ह.भ.प.नारायण दादा महाराज वाजे पंढरपूर यांचे कीर्तन शनिवार दि.६/१/२०२४ रोजी ह.भ.प. नित्यानंद महाराज मांडवकर (चणेरा )यांचे प्रवचन,ह.भ.प. शिवचरित्रकार गीतांजताई ताई झेंडे (अमहदनगर )यांचे किर्तन, रविवार दि.७/१/२०२४ रोजी गुरुवर्य विठोबा महाराज मांडळुस्कर (वणी )यांचे प्रवचन ह.भ.प. जगदीश महाराज जोशी ( त्र्यंबकेश्वर नाशिक) यांचे किर्तन,सोमवार दि.८/१/२०२४सकाळी ९.०० ते ११.०० ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे काल्याचे किर्तन होणार असुन सर्व कार्यक्रम यशश्विकरण्यासाठी जयभवानी ग्रामस्थ व महिला मंडळ, क्रीडा मंडळ वाशी अथक परिश्रम घेत आहेत.
