महाराष्ट्र वेदभुमी

एकविरा कला संस्था पनवेल रायगड, श्री.बी.के.पाटील फाउंडेशन (केळवणे पनवेल) भूमीकन्या सन्मान' २०२४



विशेष प्रतिनिधी: पनवेल

एकविरा कला संस्था पनवेल रायगड आणि श्री.बी.के.पाटील फाउंडेशन (केळवणे पनवेल) या संस्थेमार्फत ठाणे,पालघर, रायगड,नवी मुंबई आणि मुंबई या ठिकाणच्या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा 'भूमीकन्या सन्मान' २०२४ ने सन्मान करण्यात आला...

रविवार दिनांक २८ जानेवारी २०२४ वेळ सायंकाळी साडेतीन वा. गोखले हॉल महानगरपालिकेजवळ पनवेल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले....

एकविरा कला संस्था पनवेल रायगड आणि श्री.बी.के.पाटील फाउंडेशन (केळवणे पनवेल) या संस्थेमार्फत समाजातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, व्यावसायिक, पत्रकार, डॉक्टर, वकील, पोलीस , सैनिक पत्नी मेकअप आर्टिस्ट, मॉडलिंग, बचत गट, लघुउद्योग, कलाक्षेत्र यामध्ये काम करणाऱ्या महिलांची निवड करण्यात आली...तसेच  विशेष सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष, गायक, दिग्दर्शक तेजस पाटील यांच्या एकविरा कला संस्था पनवेलतर्फे 'भूमीकन्या सन्मान २०२४'  हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले...

या कार्यक्रमाला उपस्थित सौ.चारुशीला घरत (माजी नगराध्यक्ष) सौ.सिमाताई घरत (शेकाप उरण तालुकाध्यक्ष ) श्री.रुपेश पाटील (तालुकाध्यक्ष शिवसेना शिंदे गट पेण) श्री.सोमनाथ कोळी(गायक) कु.विक्रांत पाटील(युट्युबर) सौ.आक्कासाहेब(युट्यूबर) सौ.योगिता घरत(शहराध्यक्ष भाजप उल्वानोड) सौ.वनिताला पाटील (शहराध्यक्ष भाजप कामोठे) सौ.वंदना गौरी (भुमीपूत्र भुमीकन्या संघटना अध्यक्ष) आदी मान्यवर उपस्थित होते..

या कार्यक्रमाला महिलांनी विशेष उपस्थिती दर्शविली..तसेच अध्यक्ष तेजस पाटील यांचे मान्यवर आणि पुरस्कृत महिलांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले..





Post a Comment

Previous Post Next Post