महाराष्ट्र वेदभुमी

नाशिक येथे केंद्रीय राज्यमंत्री भारती ताई पवार यांच्या हस्ते राज्यस्तरीय'आदर्श सरपंच' पिंट्या गायकवाड पुरस्काराने सन्मानित


अब्दुल सोगावकार : अलिबाग

सोगाव : श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग दिंङोरीप्रणित - अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ गुरूपीठ, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर,  जिल्हा-नाशिक यांच्या अंतर्गत जागतिक कृषी महोत्सव २०२४ ,दि.२४ ते २८ जानेवारी २०२४ दरम्यान ङोंगरे वसतिगृह मैदान, गंगापूर रोड, नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री भारती ताई पवार यांच्या हस्ते 'आदर्श सरपंच' पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

               रविवार दि. २८ जानेवारी २०२४ ला या महोत्सवात महाराष्ट्रातील "सरपंच मांदियाळी" संपन्न झाली, त्यामध्ये महाराष्ट्रातील सामाजिक व विकासात्मक धोरणाबद्दल १३ सरपंचाना आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, त्यामध्ये प्रामुख्याने रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद(पिंटया) सुधीर गायकवाड यांची एकमेव निवड करण्यात आली होती, यावेळी पिंट्या गायकवाड यांना 'आदर्श सरपंच' म्हणुन परमपूज्य गुरूमाऊली व (केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जनजातीय कार्य राज्यमंत्री-भारत सरकार) डॉ.भारती ताई पवार यांनी राज्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित केले. यावेळी मिळालेल्या महाराष्ट्रातील १३ निवडक सरपंचांना राज्यस्तरीय देण्यात आला. या पुरस्काराबद्दल किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांचे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे...


किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी दिलेली प्रतिक्रिया, 

कोट :- सदरचा हा मिळालेला राज्यस्तरीय 'आदर्श सरपंच' पुरस्कार मी माझे राजकीय गुरू स्व.माजी आमदार मधुकर ठाकूर यांना व मला निवडून दिलेल्या जनतेला समर्पित करीत आहे, माझे राजकीय आधारस्तंभ खा. सुनिल तटकरे, महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे, आमदार अनिकेत तटकरे व अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या सहकार्याने किहीम ग्रामपंचायतीमध्ये विकासाच्या माध्यमातून कायापालट करणार आहे. हा सन्मान माझा नसून माझ्या निवडून दिलेल्या जनतेचा आहे. यापुढेही जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणार आहे...

फोटो लाईन : अलिबाग तालुक्यातील किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांना सन्मानित करताना केंद्रीय राज्यमंत्री भारती ताई पवार व उपस्थित मान्यवर,

Post a Comment

Previous Post Next Post