महाराष्ट्र वेदभुमी

महेश नागावकर यांना कुलाबा जीवन गौरव पुरस्कार २०२४ ने केले सन्मानित


अब्दुल  सोगावकर अलिबाग

सोगाव :भाई जगताप मित्र मंडळ रायगड, मधूकर ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट अलिबाग, विश्वजितदादा कदम युवा मंच, ऍड.उमेश ठाकूर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ऍड. उमेश ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त सातिर्जे ता.अलिबाग येथे कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, पत्रकार तथा वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह  कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

          या कार्यक्रमात अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील महेश कलाकेंद्राचे प्रसिद्ध चित्रकार तथा मूर्ती कलाकार महेश नागावकर यांना चित्रकला व मूर्ती कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शेकापचे माजी आमदार पंडित पाटील,  शेकापच्या रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखाताई पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुनिल थळे, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकुर, ऍड. उमेश ठाकूर यांच्याहस्ते कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२४ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी महेश नागावकर यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगा यांनी हा पुरस्कार स्विकारला. याच कार्यक्रमात महेश नागावकर यांनी ऍड. उमेश ठाकुर यांचे हुबेहूब काढलेले चित्र याची फोटोफ्रेम तसबीर ऍड. उमेश ठाकुर यांना वाढदिवसानिमित्त भेट दिली, या तसबिरीची सर्वच उपस्थितांनी दाद देत महेश नागावकर यांचे कौतुक केले.

          महेश नागावकर हे आपले वडील कै. मधुकर नागावकर यांच्या कलाकेंद्रात घराची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने लहानपणापासूनच हातभार लावत असत. महेश नागावकर यांनी शिक्षणासह आपल्या कलाकेंद्रात चित्रकला, मूर्ती घडवण्याची कला हस्तगत केली. तेव्हापासूनच ते आपल्या कलाकेंद्रात गणेशोत्सव काळात गणपतीच्या मूर्ती तर नवरात्रोत्सव काळात देवींच्या मूर्ती, मुखवटे, सर्व प्रकारचे वाहन पेंटिंग, फोटो पेंटिंग अश्या अनेक पेंटिंग ते सुबक व सुंदर असे चित्रकाम तसेच नक्षीकाम करत आहेत. त्यांच्या या कलाकृती रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध झालेल्या आहेत. या सुबक व सुंदर कलाकृतींची दखल उपरोक्त संस्थांनी घेऊन महेश नागावकर यांना कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२४ मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याने महेश नागावकर यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे...

फोटो लाईन :'कुलाबा जीवन गौरव पुरस्कार २०२४' ने महेश नागावकर यांना सन्मानित करताना माजी आमदार पंडितशेठ पाटील, शेकापच्या नेत्या चित्रलेखाताई पाटील, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुनिल थळे व इतर मान्यवर,

Post a Comment

Previous Post Next Post