महाराष्ट्र वेदभुमी

जिल्हास्तरीय पत्रकार क्रिकेट चषक २०२४ महाड येथे संपन्न


माणगाव प्रतिनिधी सिकंदर आंबोणकर 

मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून रायगड प्रेस क्लब व महाड प्रेस असोसिएशन ह्यांनी फक्त पत्रकारांच्या रायगड जिल्हास्तरीय मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने चांदे क्रीडांगण महाड,रायगड येथे दि.०६ जानेवारी २०२४ रोजी आयोजीत केले होते.या स्पर्धेमध्ये जिल्ह्यामधून १२ संघाने सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो गोरेगाव- लोणेरे प्रेस असोसिएशन संघ,द्वितीय क्रमांक अलिबाग प्रेस असोसिएशन,तृतीय क्रमांक पेण संघाने तर चतुर्थ क्रमांक पाली-नागोठणे संघाने पटकाविला...

सदर स्पर्धेत अंतिम सामन्याचा सामनावीराचा मानकरी गोरेगाव संघाचा वैभव टेंबे,त्याचप्रमाणे स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज गोरेगाव संघाचा चंद्रकांत गोरेगावकर,स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज पेण संघाचा निलेश तर स्पर्धेमधील मालिकावीर म्हणून अलिबाग संघाचा भूषण मानकरी ठरला...

स्पर्धेचे नियोजन तसेच सर्व खेळाडूंच्या पाहुणचाराची चोख व्यवस्था महाड प्रेस असोसिएशन ने फार चांगल्या प्रकारे केली होती.सदर क्रिकेट च्या स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या...

Post a Comment

Previous Post Next Post