अब्दुल सोगावकर अलिबाग
सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांच्या माध्यमातून
सोगाव : अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी हे नेहमी काही ना काही समाजपयोगी व लोकोपयोगी उपक्रम राबवित असतात...सामाजिक उपक्रम राबविण्यात त्यांचा चांगला हातखंडा आहे...
सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी असाच काहीसा समाजपयोगी व लोकोपयोगी भारत गॅस सबसिडी मिळण्यासाठी आधारकार्ड अपडेट शिबीर गुरुवार दि. ०४ जानेवारी २०२४ रोजी मूनवली येथे आयोजित केला होता... कोरोना काळात काही कारणास्तव बंद झालेली सबसिडी पुन्हा चालू करण्यासाठी भारत गॅस वितरकांमार्फत मूनवली पंचक्रोशीतील गॅस धारकांना गॅस सबसिडी जमा होत नसल्याने त्यांनी भारत गॅस धारकांना सबसिडी मिळावी यासाठी आधारकार्ड अपडेट शिबिराचे आयोजन केले होते,..
या शिबिराचा मूनवली, सोगाव, चोरोंडे व पंचक्रोशीतील भारत गॅस धारकांनी आधारकार्ड अपडेट करून घेण्यासाठी मोठी गर्दी करत लाभ घेतला. यावेळी ग्रामस्थांनी विशेषतः महिलांनी सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी व भारत गॅस वितरकांचे गॅस सबसिडी पुन्हा एकदा मिळण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल तसेच आधारकार्ड अपडेट करण्यासाठी अलिबाग शहरात जाऊन रांगेत उभे राहण्याचा त्रास व वेळेची बचत केली, तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी सचिन घाडी व भारत गॅस वितरक यांनी आपल्या गावातच शिबिराचे आयोजन करण्यात महत्वाची भूमिका बजावली, याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले...
फोटो लाईन : मूनवली येथे सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांच्या माध्यमातून गॅस सबसिडीसाठी आधारकार्ड अपडेट करण्यासाठी शिबिरात उपस्थित भारत गॅस वितरक कर्मचारी यांचे स्वागत करताना ग्रामस्थ,
