महाराष्ट्र वेदभुमी

आई सिंधुताई सपकाळ महिला ग्राम संघ मापगाव तसेच मुशेत ग्रामस्थांच्यावतीने महिलांसाठी कार्यक्रम

अब्दुल सोगावकर

सोगाव : अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्र प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधत २२ जानेवारी रोजी मुशेत येथे आई सिंधुताई सपकाळ महिला ग्राम संघ मापगाव तसेच मुशेत ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते...

मुशेत पंचक्रोशीतील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ तसेच प्रसिद्ध गायक रोहित पाटील आणि प्रसिद्ध गायिका रेश्मा पाटील यांच्या गाण्यांचा आर्केस्ट्रा आणि खास क्रीडा रसिकांसाठी जिल्हास्तरीय भव्य महिला कबड्डी स्पर्धा असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले...

  महिला कबड्डी स्पर्धांचे उद्घाटन अलिबाग तालुका शिवसेना.(शिंदे गट)अध्यक्ष अनंत गोंधळी यांच्या हस्ते करण्यात आले... याप्रसंगी बोरीस - गुंजीस उपसरपंच मोहिनी वेंगुर्लेकर, महिला आघाडी प्रमुख संजीवनी नाईक, सातीर्जे सरपंच प्राजक्ता खडपे, मापगाव ग्रामपंचायत सदस्य विजय भगत, सातीर्जे ग्रामपंचायत सदस्या खळगे, राजेंद्र करळकर, महेंद्र करळकर, जगदीश सावंत, श्रीकांत मोरे, मनीष म्हात्रे, रुपेश निर्गुण आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने मुशेत पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि महिला वर्ग उपस्थित होते...

 कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक श्री भिल्लेश्वर किहीम संघाने पटकावला. द्वितीय क्रमांक टाकादेवी स्पोर्ट्स मांडवा संघाने पटकावला आणि तृतीय क्रमांक शिवकन्या पाली संघाने पटकावला, तसेच चतुर्थ क्रमांक वृतिका स्पोर्ट्स पेण संघाने पटकावला....

 स्पर्धेत उत्कृष्ट पकड टाकादेवी स्पोर्ट्स मांडवा संघाची निमिषा पाटील यांनी मान मिळविला, तर उत्कृष्ट चढाई ऋतिका स्पोर्ट्स पेण संघाची वैष्णवी पाटील हिला मान देण्यात आला. पब्लिक हिरो म्हणून शिवकन्या संघ पाली संघाची प्रियांका हिला मान देण्यात आला, तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून भिल्लेश्वर किहीम संघाची चैताली म्हात्रे हिचा गौरव करण्यात आला...

 या कबड्डी स्पर्धेदरम्यान अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी सदिच्छा भेट दिली, तसेच मापगाव ग्रामपंचायत सदस्य विजय भगत, वसीम कूर, किहीम सरपंच पिंट्या गायकवाड, प्रसिद्ध उद्योजक सचिन तावडे, सामाजिक कार्यकर्त्या छाया म्हात्रे, बैलगाडी फायनल सम्राट अनिल जाधव, बहिरोळे शाखाप्रमुख राजेंद्र घरत, मुद्स्सर कुर, विजय थळे, सोगाव शाखाप्रमुख इलियास हाफीज, प्रभाकर मोहिते, विकास राणे, मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अशोक नाईक, माजी ग्रामपंचायत सदस्य मजीद कूर, उत्तम राऊत, मनोज काठे, मंदार आपटे, तेजस करळकर, बैलगाडी फायनल सम्राट प्रसन्न खडपे, अजित राऊत, जितेंद्र ठाकूर, मापगाव ग्रामपंचायत सदस्या स्नेहा रूत व इतर मान्यवर उपस्थित राहून प्रोत्साहन दिले. या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान अथर्वशीर्ष पठण संस्कार वर्गाच्या प्रमुखा श्रीमती संपदा पोंगडे यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांसमवेत पठण केले. यावेळी बचत गटाच्या सीआरपी विनया सावंत आवर्जून उपस्थित होते...कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गावदेवी क्रीडा मंडळ मुशेत यांनी विशेष मेहनत घेतली तसेच सर्व महिला बचत गटांनी सुद्धा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता अतिशय मेहनत घेतली...कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांना व पाहुण्यांना भोजनव्यवस्था करण्यासाठी मोहिनी मधुकर सावंत आणि जागृती जगदीश सावंत यांनी विशेष मेहनत घेतली...

 या कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास जागृती सावंत, मोहिनी सावंत, प्राजक्ता म्हात्रे, भाग्यश्री म्हात्रे, संजना म्हात्रे, राजश्री जाधव, हेमांगी जाधव, मोहिनी सावंत तसेच जितेंद्र करळकर, प्रतिक सावंत, विक्रांत कदम, निमिष पाशिलकर, महेंद्र करळकर, मंदार सावंत, मनिष म्हात्रे आदी इतर मान्यवर उपस्थित होते...    

या संपूर्ण कार्यक्रमांकरीता मुशेत येथील सामाजिक कार्यकर्ते जगदीश सावंत, गितेश करळकर आणि मुशेत ग्रामस्थ, महिला वर्ग यांनी विशेष मेहनत घेतली...कार्यक्रमाचे व कबड्डी स्पर्धेचे सूत्रसंचालन तथा समालोचन अजित हरवडे सर यांनी केले...

फोटो लाईन : पहिल्या चित्रात- मुशेत येथे महिला कबड्डी स्पर्धेला उपस्थित अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांचे स्वागत करताना सामाजिक कार्यकर्ते जगदीश सावंत व उपस्थित मान्यवर,

दुसऱ्या चित्रात : कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या श्री भिल्लेश्वर किहीम संघाला मुशेत महिला मंडळातर्फे पारितोषिक देताना जागृती सावंत, मोहिनी सावंत, प्राजक्ता म्हात्रे, संजना म्हात्रे, राजश्री जाधव, हेमांगी जाधव व इतर,

Post a Comment

Previous Post Next Post