शहानवाज मुकादम/रोहा
न्यायालयाने सुनावली १६ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी...
रोहा:चणेरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या तीन चोरट्यांना रोहा पोलीसांकडून अटक, आरोपीना रोहा न्यायालयाकडून १६ जानेवारीपर्यंत सुनावली पोलीस कोठडी.दि:१२/०१/२४' रोजी फिर्यादी सौ,संगिता दिलीप महाले वय ४८ वर्ष रा.खुटल ही महिला रोहा-रेवदंडा रोडने खुटल येथून चणेरा येथे जात होत्या... फिर्यादी मौजे बंटी किंदरे यांच्या घरा समोर आले वेळी पाठीमागून रोहा बाजूकडून एक मोटारसायकलवर अलेल्या तीन इसमांनी संगणमताने येवून मोटारसायकलवर मध्ये बसलेल्या इसमाने फिर्यादी यांच्या गळ्यातील ३०,हजार किमतीच्या सोन्याचे एकसरी मंगळसुत्र जबरीने खेचून घेतले...
त्यावेळी फिर्यादीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आसता, मोटारसायकल च्या पाठीमागे बसलेल्या इसमाने हाताने फिर्यादी यांना धक्का दिल्याने त्या खाली पडल्या त्या वेळेस फिर्यादी यांचे कमरेला मुका मार लागला, तसेच मंगळसुत्र खेचताना मानीजवळ जखम झाली आहे...
सदर प्रकरणी आरोपी (१) राजेश हरिश्चंद्र राजपूत, (२) सचिन तानाजी राजपूत, (३) अरुण कैलास राजपूत, सर्व राहणार मुळशी जि.पुणे यांच्याविरुद्ध कॉ.गु.र नं.०९/२०२४, भा.द.वि.सं.कलम ३९४,३४ प्रमाणे रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आसुन रोहा न्यायालयाकडून आरोपींना १६ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे...
सदरचा तपास रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक, व्हि, एस, वायंगणकर करीत आहेत...
या मंगळसुत्र चोरट्यांमुळे चणेराविभागातील महिलांना चणेरा या ठिकाणी बाजार निमित्ताने ये-जा करावा लागत आसुन दिवसाढवळ्याच हा प्रकार घडला आसल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहेत.
रोहा पोलीसांकडून चेक पोस्ट खारी येथे बाहेरून येणाऱ्या मोटारसायकल व इतर वाहनांची तपासणी करण्यात यावी जेणेकरुन आश्या घटनांना आळा बसेल.
