महाराष्ट्र वेदभुमी

किहीम ग्रामपंचायत हद्दीत रिक्षा चालकांमध्ये प्रवासी भाडे घेण्यावरून वाद



अलिबाग : अब्दुल सोगावकर 

स्थानिक व इतर ठिकाणच्या चालकांमध्ये वाद

किहीम येथे अधिकृत रिक्षा स्टँडच्या जागेची सरपंच पिंट्या गायकवाड यांच्याकडे मागणी

रिक्षा चालकांचा वाद सामोपचाराने सोडवण्यात सरपंच पिंट्या गायकवाड यांना यश

सोगाव :अलिबाग तालुक्यातील किहीम बीच हे पर्यटकांची प्रथम पसंती असलेले प्रमुख पर्यटनस्थळ आहे, याठिकाणी मुंबई, ठाणे, नवीमुंबई, पनवेल आदी ठिकाणावरून गेटवे ते मांडवा या जलमार्गाने जास्त प्रवास करताना दिसतात... हा जलमार्ग जलद व वेळेची तसेच इंधनाची बचत करणारा असल्याने पर्यटक या प्रथम प्राधान्य देतात, मात्र गेटवे वरून मांडवा व इतर ठिकाणावरून किहीम येथे आल्यावर काही पर्यटक रिक्षाने येतात व पुन्हा परतीच्या प्रवासाला जाताना त्यांच्याच रिक्षाने जातात, यामुळे स्थानिक रिक्षा चालकांना पर्यटकांचे भाडे न मिळाल्याने आर्थिक नुकसान व उपासमार होत असल्याबाबत स्थानिक रिक्षा चालकांनी बाहेरील रिक्षा, मिनिडोअर, टॅक्सी चालकांना गेल्या काही दिवसांपासून किहीम हद्दीत व्यवसाय करण्यास मज्जाव करत प्रवासी भाडे घेण्यावरून वाद होत होते...

  याविषयी विक्रम मिनिडोअर चालक मालक कल्याणकारी संस्था, अलिबाग यांनी याबाबत सामंजस्य तोडगा काढावा यासाठी तक्रार अर्ज संघटनेच्या वतीने किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांच्याकडे देत केली होती... यासोबतच किहीम हद्दीत रिक्षा स्टँड साठी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी देखील केली होती... 

  याबद्दल सविस्तर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी सरपंच पिंट्या गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली किहीम ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवार दि. १६ जानेवारी रोजी सर्व स्थानिक व बाहेरील व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांची बैठक घेण्यात आली, यावेळी किहीम उपसरपंच मिलिंद पडवळ, ग्रामपंचायत सदस्य, अलिबाग तालुका रिक्षा युनियनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सभासद व स्थानिक रिक्षा चालक - मालक उपस्थित होते...

 यावेळी किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी उपसरपंच मिलिंद पडवळ व ग्रामपंचायत सदस्य, पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत रिक्षा संघटनेच्या तक्रारीवर स्थानिक रिक्षा चालकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय न होता यशस्वी तोडगा काढण्यात यश आले. तसेच यापुढेही सर्व प्रकारचे सहकार्य किहीम ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्याचे आश्वासन दिले...

          यावेळी यशस्वी तोडगा काढल्याबद्दल सर्व स्थानिक व बाहेरील रिक्षा, मिनिडोअर, टॅक्सी चालक मालकांनी प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीत सहकार्य करणारे किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांच्यासह उपसरपंच मिलिंद पडवळ व सदस्यांचे व ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले...

फोटो लाईन : किहीम येथे स्थानिक व बाहेरील रिक्षा, मिनिडोअर व टॅक्सी चालकांसोबत चर्चेद्वारे तोडगा काढताना सरपंच पिंट्या गायकवाड, उपसरपंच मिलिंद पडवळ व इतर मान्यवर,

Post a Comment

Previous Post Next Post