महाराष्ट्र वेदभुमी

शिवसाई क्रीडा मंडळ मापगांव आयोजित क्रिकेट स्पर्धेत साई झिराड संघ विजयी



 अलिबाग प्रतिनिधी अब्दुल सोगावकर

सोगांव : दि१७जानेवारी, अलिबाग तालुक्यात मोठ्या प्रमाणात शिस्तबद्ध क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात प्रसिद्ध असणारा नावाजलेला शिवसाई क्रीडा मंडळ मापगांव हा संघ आहे, हा संघ तालुक्यात सर्वांना सुपरिचित व नावाजलेला संघ आहे.

     श्री शिवसाई क्रीडा मंडळ, मापगाव एम, सी. सी. आयोजित स्व. वसंत यशवंत राऊत स्मृती चषक २०२४ " ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट स्पर्धा १२ ते १४ जानेवारी या दरम्यान तीन दिवसीय भव्य स्पर्धा मापगांव क्रीडांगणावर भरविण्यात आली होती, या स्पर्धांचे उद्घाटन अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी ग्रुप ग्रामपंचायत मापगांव माजी उपसरपंच वसीम कुर, मापगाव ग्रामपंचायत सदस्य विजय भगत, श्री क्लासेस चोंढी-संतोष राऊत सर, किहीम सरपंच पिंट्या गायकवाड, मापगाव ग्रामपंचायत सदस्या स्नेहा रुत, संतोष रुत, बाबू थळे, उत्तम राऊत, प्रभाकर मोहिते, अजित राऊत, रामचंद्र राऊत, साहिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते अजित घरत, जगदीश सावंत, छाया म्हात्रे, गितेश करळकर, मनिष म्हात्रे, राजेंद्र घरत, दिनेश राऊत, सुमेश थळे, दिपक म्हात्रे, जगन्नाथ पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

          या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात साई झिराड व साई झालखंड यांच्या मध्ये होऊन अटीतटीच्या लढतीत साई झिराड संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक ५५,५५५/ रुपये व चषक पटकावला, तर साई झालखंड संघाने द्वितीय क्रमांक ३३,३३३/रुपये व चषक पटकावला,तसेच टायगरलेन सासवणे संघाने तृतीय क्रमांक १५,५५५/रुपये व चषक पटकावला आणि शिवसाई मापगाव संघाने चतुर्थ क्रमांक १५,५५५/रुपये व चषक पटकावला. 

             स्पर्धेत मालिकावीर - साई राणे शिवसाई मापगांव याला घोषित करत पारितोषिक देण्यात आले, तर उत्कृष्ट फलंदाज - अजिंक्य वैते साई झिराड संघ याला घोषित करत पारितोषिक देण्यात आले. उत्कृष्ट गोलंदाज - हितेश राऊत शिवसाई मापगांव संघ याला घोषित करत पारितोषिक देण्यात आले, तर सिक्सर किंग - अजिंक्य वैते साई झिराड संघ याला घोषित करत पारितोषिक देण्यात आले तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक - विश्वेश काजरे टायगरलेन सासवणे संघ याला घोषित करत पारितोषिक देण्यात आले आणि चौकार किंग - मनोज काठे शिवसाई मापगांव संघ याला घोषित करत पारितोषिक देण्यात आले, शिस्तबद्ध संघ - साई झालखंड या संघाचा यथोचित सन्मान करण्यात आला.

         स्पर्धेचे बक्षीस वितरण रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती व भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख दिलीप भोईर यांच्याहस्ते व श्री क्लासेस चोंढी चे संतोष राऊत सर, मापगाव ग्रामपंचायत माजी उपसरपंच वसीम कुर, मापगाव ग्रामपंचायत सदस्य विजय भगत, मापगाव ग्रामपंचायत सदस्या स्नेहा रुत, अजित घरत, उत्तम राऊत, उदय मधुकर राऊत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मापगांव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा काळात अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून स्पर्धकांना व आयोजकांना प्रोत्साहन दिले. स्पर्धेत तीन दिवस सतत क्रिकेट समालोचक म्हणून यश मापगावकर, सुजित पाटील, प्रितेश पाटील, निनाद कदम, निखिल पडते यांनी उत्तमरीत्या केले तर बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन संतोष राऊत सर यांनी केले.

फोटो लाईन : शिवसाई क्रिकेट मापगाव स्पर्धेत साई झिराड संघाला विजेतेपद देतांना दिलीप भोईर व उपस्थित मान्यवर,

Post a Comment

Previous Post Next Post