माणगाव प्रतिनिधी सिकंदर आंबोणकर
सकल मराठा परिवार रायगड टीम व अवनीर एज्युकेशन सर्विस प्रा. लि.यांच्या संयुक्त विद्यमाने महारोजगार मेळाव्याचे आयोजन दि.२३ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९:०० ते सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत के.एम.सी कॉलेज खोपोली जि. रायगड येथे आयोजित करण्यात आले आहे.सदर रोजगार मेळाव्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास असणार आहे, तसेच नोंदणी शुल्क फक्त १०० रू आकारण्यात येणार आहेत.ह्या मेळाव्यासाठी इच्छुकांनी https://forms.gle/bTqvY6j3keTcG1pug ह्या लिंकवर जाऊन नोंदणी करावयाची आहे, तसेच अधिक माहिती साठी रूपाली पिलाणे मो.न.९१३७६६८४५२,संदेश दुर्गे मो.न.७८७५०६००४२, स्वप्नील बांगर मो.न.९९६०३७५४५६ यांच्याशी संपर्क साधावा व जास्तीत जास्त इच्छुकांनी सदर मेळाव्यात सहभाग घ्यावा असे आवाहन सकल मराठा परिवार रायगड यांनी केले आहे...
