महाराष्ट्र वेदभुमी

राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने हनुमान मंदिर बहिरोळे येथे विविध कार्यक्रम


अलिबाग प्रतिनिधी अब्दुल सोगावकर 

सोगांव : अयोध्या येथील राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने अलिबाग तालुक्यातील बहिरोळे येथील श्री हनुमान मंदिर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला बहिरोळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           यावेळी राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने बहिरोळे हनुमान मंदिरात श्रीसत्यनारायणाची पूजा, रामरक्षा सामुहिक पठण, मारुती स्तोत्र, भव्य शोभायात्रा, संपूर्ण हनुमान मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, दिपोत्सव, श्रीराम जय राम जय जय राम मंञ याचे १०८ वेळा सामुहिक पठण करण्यात आले. यावेळी हनुमान मंदिरात कार्यक्रमावेळी शनिवार भजन मंडळ बहिरोळे यांना नुकतेच कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२४ मिळाल्याबद्दल भजन मंडळाच्या प्रत्येक सदस्याचा रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व मापगाव ग्रामपंचायतीचे प्रमुख मार्गदर्शक तसेच बहिरोळे ग्रामस्थ सुनिल थळे यांनी गौरवचिन्ह देऊन सर्वांना सन्मानित केले. त्यानंतर हनुमान मंदिर परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, कार्यक्रमाच्या शेवटी शनिवार भजन मंडळ बहिरोळे या मंडळातर्फे सुश्राव्य भजन करण्यात केले. यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

          या सर्व कार्यक्रमाचे नियोजन बहिरोळे येथील ग्रामस्थ विवेक जोशी यांनी करत कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाला बहिरोळे पंचक्रोशीतील व बहिरोळे गावातील लहान मुले आणि मुली, महिला व पुरुष ग्रामस्थ तसेच विशेष करुन महिला वर्ग पारंपारिक वेशभूषेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो लाईन :पहिल्या चित्रात - अयोध्या येथील प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्ताने बहिरोळे येथील हनुमान मंदिरात केलेली विद्युत रोषणाई,

दुसऱ्या चित्रात : अयोध्या येथील प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमा निमित्ताने बहिरोळे पंचक्रोशीतील उपस्थित पुरुष व महिला वर्ग,

Post a Comment

Previous Post Next Post