महाराष्ट्र वेदभुमी

विक्रांत जंगम याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण,

 

कोलाड (श्याम लोखंडे ) 

कामगाराला बरे वाटूनही हजर केले जात नाही,

विक्रांत वर घर विकण्याची वेळ, संसार उध्वस्थ,

बेक केमिकल्स कंपनी व्यवस्थापनाचा कामगाराच्या प्रति असहकार्य

रोहा धाटाव औद्योगिक क्षेत्रातील बेक केमिकल्स कंपनी व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे विक्रांत जंगम याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. २६ जाने. प्रजासत्ताक दिनी आपले हक्क मागण्याकरिता त्याची तारेवरची कसरत पहायला मिळणार आहे. कामावरून काढल्याने त्याच्यावर घर विकण्याची वेळ आली. कुटुंब स्थीर नसल्याने ते उद्धवस्थ होण्याच्या मार्गावार असताना आता त्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे...

      विक्रांत रमाकांत जंगम हा बेक केमिकल्स प्रा. लि. धाटाव या कंपनीचा कामगार आहे. कंपनीत अचानक चक्कर येऊन पडल्याने त्याच्यावर जून २०१८ साली ब्रेन ट्युमर या आजाराचे निदान करण्यात आले होते. त्या अनुषंगाने या आजारावर उपचार करण्यासाठी "आदित्य बिरला मेमोरियल हॉस्पिटल पुणे" येथे ब्रेन ट्युमर या आजारासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. ती शस्त्रक्रिया पुर्णतः सफल झाली नव्हती, त्यादरम्यान त्याच्या शरीराचे संतुलन गमावले होते. व काहीअंशी चालण्यासाठी अपंगत्व आले. त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाच्या सहकार्याने याच सेम कंडीशनला जंगम पुन्हा १७ डिसेंबर २०१८ रोजी कंपनीच्या सेवेत कार्यरत होण्यासाठी रुजू झाले. यादरम्यान, कंपनी व्यवस्थापनाने त्यांना हालचाली करण्याकरीता स्टीकचा वापर करण्याची परवानगीही दिली होती, अशा परिस्थितीत त्याने जून २०२१ पर्यंत म्हणजेच जवळपास अडीच वर्षे यशस्वीरीत्या कंपनीत काम केले. यादरम्यान ते कुठल्याही प्रकारची कामात दिरंगाई न करता नेमून दिलेले काम करत होते...

      जंगम यांचे पहिले ऑपरेशन अयशस्वी झाले असल्यामुळे पुन्हा त्रास होऊ लागला व त्यासाठी त्याने कंपनी व्यवस्थापनाला कळवून पुढे जुलै २०२१ पासून रजेवर गेले. डिसेंबर २०२१ रोजी या आजारासाठी पुन्हा त्याच्यावर "हायलंड हॉस्पिटल ठाणे" येथे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ती शस्त्रक्रिया पुर्णतः यशस्वी झाली. आता त्यांना 'ब्रेन ट्युमर' या आजाराचे कुठल्याही प्रकारचे त्रास होत नाही. शिवाय ऑपरेशन नंतर दिवसेंदिवस त्याच्या तब्बेतीत सुधरणाच होत आहे. परंतु, त्याचे पहिले ऑपरेशन अयशस्वी झाले असल्याने त्यांच्या शरीराचे गेलेले संतुलन मात्र अद्याप पुर्णतः कवर झालेले नाही. त्यामुळे सेफ्टी अनुषंगाने त्याला चालण्यासाठी स्टिकचा वापर करावा लागतो. या एकाच कारणामुळे कंपनी व्यवस्थापनाने त्यांना कामावर घेण्यास नकार दिला आहे...

कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजर क्यू. सी. या पदावर कार्यरत असल्यामुळे त्याचे संपूर्ण काम हे बसून म्हणजेच केवळ कार्यालयीन कामकाज आहे. त्यामुळे स्टिक वापरण्याचा त्याच्या कामाशी कुठल्याही प्रकारचा कसलाही संबंध येत नाही. शिवाय यापूर्वी पहिल्या ऑपरेशन नंतर जंगम यांची अशीच सेम कंडीशन असताना सुद्धा जवळपास अडीच वर्षे तो कंपनीमध्ये काम करत होता. यापूर्वी कंपनी व्यवस्थापनाला त्याच्या कामात काही चूक आहे का असे विचारले असता ते बोलायचे की तुझ्या कामात काहीच चूक नाही. महत्वाचे म्हणजे चालण्यासाठी अपंगत्व आले असतानाही तो कामात शंभर टक्के आऊटपुट देत होता. शिवाय, भविष्यात कंपनीला जर त्यांच्या अपंगत्वामुळे काही समस्या निर्माण होतील असे वाटून राहिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी देखील तो घेण्यास तयार आहे. असे असताना कंपनी प्रशासनाने त्याला घरी बसविणे योग्य वाटत नसल्याने त्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे...

विक्रांत जंगम याने उपोषणाचे पत्र देताच कामगार उपआयुक्त पनवेल रायगड यांनी २५ जानेवारी रोजी विक्रांत जंगम व कंपनी व्यवस्थापनाला चर्चेसाठी आपल्या कार्यालयात बोलावले असल्याचे पत्र त्यांना देण्यात आले आहे. आता कामगार आयुक्त काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत.

प्रतिक्रिया :-

कंपनीच्या वतीने आम्ही त्यांना कायमस्वरूपी तीन ते चार हजार रुपयांची मदत करू शकतो. पण कामावर घ्यायचे असेल तर काठीचा आधार न घेता कामावर आले तर कामावर घेऊ. - अतुल आठवले, व्यवस्थापक, बेक केमिकल कंपनी धाटाव

Post a Comment

Previous Post Next Post