महाराष्ट्र वेदभुमी

लोकशाही पायदळी तुडवणाऱ्या घटना बहाय्य सरकारचा निषेध असो.


अलिबाग विशेष प्रतिनिधी :

लोकशाही पायदळी तुडवणाऱ्या घटना बहाय्य सरकारचा निषेध असो...असे संतप्त प्रतिक्रिया अलिबागमधील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला...यावेळी जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, तालुका प्रमुख शंकर गुरव, अलिबाग शहर प्रमुख संदिप पालकर, थळ विभाग प्रमुख रूपेश जामकर, चौल विभाग प्रमुख मारुती भगत, अजित पाटील, कमलेश खरवले, अलिबाग शहर संघटिका राखी खरवले, अलिबाग उपतालुका संघटिका सौ. शीतल पेडणेकर, युवासेना युवती उपशहर अधिकारी दीपश्री भोई, आदी शिवसैनिक उपस्थित होते...

  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अलिबाग भाजप कार्यालायासमोर काळे झेंडे घेउन निषेध आंदोलन केले...शिवसेना ठाकरेचीच अशा जोरदार घोेषणा दिल्या... लवादाने केला लोकशाहीचा घात आणि विधानसभा अध्यक्षाच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या....

     आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकालवाचन केलं...यावेळी त्यांनी दोन्ही गटाचे आमदार पात्र असल्याचा निर्णय दिला...पण खरी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचं म्हटलं...निवडणूक आयोगाचा निकालाला दुजोरा देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला...तसेच सुप्रीम कोर्टाने भरत गोगावले यांचा अवैध ठरवलेला व्हीप हा विधानसभा अध्यक्षांनी वैध ठरवला...

Post a Comment

Previous Post Next Post