महाराष्ट्र वेदभुमी

रांजणपाडा ते शिर्डी श्री साईबाबांची पालखी पायीवारीचे सुनिल थळे यांनी आपल्या निवासस्थानी केले भव्य स्वागत



अब्दुल  सोगावकर अलिबाग

सोगांव: दि.९ जानेवारी, अलिबाग तालुक्यातील टाकादेवी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तसेच मापगांव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री. सुनिल थळे यांनी श्री साईधाम पालखी पदयात्रा सेवा संस्थेची साईबाबांची पालखी रांजणपाडा ते शिर्डी पायी वारीचे सालाबादप्रमाणे रविवार दि.०७ जानेवारी रोजी आपल्या टाकादेवी येथील निवासस्थानी थळे कुटुंबियांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करत दर्शन घेतले..

      या पालखी सोहळ्यात पुरुष व महिला साईभक्त मोठ्या संख्येने व मोठ्या उत्साहाने पायीदिंडी यात्रेत सहभागी झाले होते, यावेळी थळे यांच्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांनी साईभक्तांचे आपुलकीने स्वागत करत सर्व साईभक्तांना चहापाणी व अल्पोपहार देत पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या...

             याकार्यक्रमाला रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुनिल थळे यांच्या कुटुंबियांसोबत सरपंच उनिता थळे, उपसरपंच अनिता शिंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घरत, हेमंत नेमन, अण्णा सातमकर, युवा नेता सूचित थळे, मापगांव विभाग महिला बचत गट अध्यक्षा शलाका थळे, गुरुवर्य केशव चांदोरकर सर, बहिरोळे पोलीस पाटील प्रफुल्ल थळे, संदीप थळे तसेच इतर पुरुष व महिला कार्यकर्ते व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत साईबाबांच्या पालखीचे दर्शन घेतले.

फोटो ओळ: रांजणपाडा येथील साईबाबा पालखीचे टाकादेवी येथील निवासस्थानी स्वागत करतांना रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुनिल थळे व थळे कुटुंबीय आणि इतर कार्यकर्ते,

Post a Comment

Previous Post Next Post