महाराष्ट्र वेदभुमी

ग्रामीण रुग्णालय उरण येथे गुणवत्ता आश्वासन (कायाकल्प) टीमची भेट.



उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे)

गुणवत्ता आश्वासन अंतर्गत सन २०२३ वर्षातील मूल्यांकन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय उरण जि.रायगड येथे डॉ. महेश कुमार माने (DTO) बीड,व डॉ.व्यंकटेश दुडे (DAKSHATA MENTOR NANDED)यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालय उरणचे वैद्यकीय अधीक्षक बाबासो काळेल उपस्थित होते...

राष्ट्रीय आरोग्य अभियान गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम अंतर्गत (कायाकलप) मूल्यांककरिता आलेल्या टीमने ग्रामीण रुग्णालय उरण येथे आल्यानंतर प्रथम दवाखान्यातील बाहेरील स्वच्छतेची पाहणी केली त्यानंतर दवाखान्यातील कार्यरत सर्व विभागात जाऊन पाहणी केली यात पुरुष कक्ष ,स्त्री कक्ष प्रसुतीत विभाग ,ओटी विभाग, एक्सरे विभाग ,डेंटल विभाग ,प्रयोगशाळा विभाग, कार्यालय, इंजेक्शन विभाग, ओपीडी विभाग, औषध विभाग, औषध भंडार, आयसीटीसी विभाग ,टीबी विभाग वरील विभागात जाऊन टीमने संबंधित कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची विचारणा करून व नोंदणीची पाहणी केली त्यानंतर डॉ. महेश कुमार माने व डॉ. व्यंकटेश दूडे यांनी डॉ. बाबासो काळेल वैद्यकीय अध्यक्षक यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले व तसेच इतर कर्मचाऱ्यांचे कौतुक करून टीम वर्कने काम करण्यास सांगितले . व त्यानंतर सुमन या योजनेविषयी माहिती दिली व या योजनेसाठी काम करण्यास सुचविले या मूल्यांकन मध्ये डॉ. मृणालिनी कदम वैद्यकीय अधिकारी,डॉ. प्रज्ञा भगत, डॉ.प्रियंका कोळी ,डॉ. स्वाती म्हात्रे ,डॉ.स्नेहल कोळी,वैद्यकीय अधिकारी संतोष झापकर दंतचिकित्सक  महादेव पवार समुपदेशक श्रीमती हेमा म्हात्रे अधिपरीचरिका श्रीम.वावरे पी. च,एन, अलिबाग व ग्रामीण रूग्णालय उरण येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post